विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला, अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

| Updated on: May 04, 2020 | 8:13 AM

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Akola Temperature Increase) आहे.

विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला, अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
Follow us on

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Akola Temperature Increase) आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यासोबत विदर्भात आता उन्हाचा तडाखा वाढत आहे. विदर्भातील नागपुरचे तापमान 44.2 अंशावर, तर अकोल्याचे तापमान सर्वाधिक 44.9 वर पोहोचले आहे. हे तापमान विदर्भातील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात (Akola Temperature Increase) आली आहे.

गेल्या आठवड्यात विदर्भातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे उष्म्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील शहरांचे तापमान वाढत आहे. पुढील आठवड्यात तापमान आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोरोनामुळे जनता संकटात सापडली आहे. लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडता येत नाही. अशामध्येच आता तापमान वाढत असल्याने गरमी होत आहे. त्यामुळे लोकांना शीतपेयही मिळत नाही. कोरोनामुळे उन्हापासून थंडावा देणारी शीतपेयाची दुकानं बंद आहेत. उन्हाळ्यात शरीराचे तापमान कमी करण्यासाठी लोकं लिंबू पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, ज्युस, आईस्क्रिम, टरबूजकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

नुकतेच एप्रिल महिन्यातही अकोला शहरात 43.9 अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यावेळी हे विदर्भातील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद झाली होती.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 12 हजार 974 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 548 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 2115 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या :

गेल्या 9 वर्षांपासून पावसाचं प्रमाण घटलं, तापमान वाढलं, भविष्यात मोठा धोका