AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीच्या संपावरून लक्ष हटवण्यासाठी हिंसाचार घडवला- प्रवीण दरेकर

राज्यात एसटी कामगारांचा बंद सुरू आहे.  सरकारने अपयश झाकण्यासाठी व एसटी बंद वरून लक्ष हटवण्यासाठी नवाब मलीकी प्रवृत्तीचा वापर करून वातावरण गढूळ केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केला आहे.

एसटीच्या संपावरून लक्ष हटवण्यासाठी हिंसाचार घडवला- प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 5:52 PM
Share

पुणे- अमरावती जिल्ह्यात आज भाजपने पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारात भाजपचे कार्यकर्ते नव्हते. जनता स्वस्फूर्तीने या बंदमध्ये उतरली असून, या बंदमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते ही सहभागी झाले होते,असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

 नवाब मलीकी प्रवृत्तीचा वापर

राज्यात एसटी कामगारांचा बंद सुरू आहे.  सरकारने अपयश झाकण्यासाठी व एसटी बंद वरून लक्ष हटवण्यासाठी नवाब मलीकी प्रवृत्तीचा वापर करून वातावरण गढूळ केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळावर प्रवीण दरेकर व माजी आमदार राम शिंदे यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

सत्तेत आल्यावर शिवसेनेची भूमिका बदलली बाळासाहेब ठाकरेंना लोकांनी हिंदू हृदयसम्राट अशी पदवी दिली होती. त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर त्यांच्याही भूमिका बदलल्या , तेही त्यांच्या सारखेच वागायला लागल्याची टीका त्यांनी केली आहे. यापूर्वी महाराष्ट्र शिवसेना- भाजपचा पाचवर्षे सरकार होते. तेव्हा कुठं दंगली झाल्या नाहीत. कुठंही जातीय तेढ निर्माण झाली नाही. पण जेव्हा- जेव्हा राज्यात काँग्रेसचे सरकार आले, तेव्हा हिंदू-मुस्लिम दंगली झाल्याचा आरोप करत दरेकरांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.

यापूर्वी भाजपाचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी अमरावती हिंसाचारा मागे महाविकास आघाडी सरकारचे कटकारस्थान असल्याचे विधान केल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हि आता राज्य सरकार वरती निशाना साधला आहे. भाजपने शनिवारी अमरावती बंदची हाक दिली होती. या बंद दरम्यान शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकातून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करीत काही दुकानांना लक्ष्य केले. तोडफोड व जाळपोळही केली. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केला. एवढेच नाही, तर येथील चांदणी चौक भागात दोन समुदायांचे गट आमने-सामने आले होते. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबारही करावा लागला.

हेही वाचा

Video | जाळपोळ, दगडफेकीनंतर अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण, चार जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवली

Video : कोव्हिड काळात मुख्यमंत्री पैसे मोजण्यात व्यस्त म्हणून मानेचा त्रास, किरीट सोमय्यांचं ठाकरेंच्या दुखण्यावर बोट

मालेगावमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक, पोलीस अधीक्षकांची माहिती; आमदारांकडून सूत्रधाराच्या अटकेची मागणी

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.