फॉक्सवॅगनला 100 कोटींचा दंड

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) जर्मनीच्या कार निर्माती कंपनी फॉक्सवॅगनला 100 कोटींचा दंड ठोठावला आहे. फॉक्सवॅगनने डिझेल गाड्यांमध्ये लावलेल्या ‘चीट डिव्हाईस’ उपकरणामध्ये फेरफार करत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाला धोका दिल्याने एनजीटीने हा दंड ठोठावला आहे. एनजीटीचे अध्यक्ष आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी केंद्राने […]

फॉक्सवॅगनला 100 कोटींचा दंड
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) जर्मनीच्या कार निर्माती कंपनी फॉक्सवॅगनला 100 कोटींचा दंड ठोठावला आहे. फॉक्सवॅगनने डिझेल गाड्यांमध्ये लावलेल्या ‘चीट डिव्हाईस’ उपकरणामध्ये फेरफार करत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाला धोका दिल्याने एनजीटीने हा दंड ठोठावला आहे.

एनजीटीचे अध्यक्ष आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी केंद्राने ही समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये पर्यावरण मंत्रालय, उद्योग मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या सदस्यांचा समावेश असतो.

या समितीने दिलेल्या निर्णयानुसार, फॉक्सवॅगन कंपनीला आपली बाजू मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. फॉक्सवॅगनने दिलेल्या मुदतीत रक्कम न भरल्यास फॉक्सवॅगनच्या गाड्यांवर बंदी आणली जाऊ शकते.

काय आहे चीट डिव्हाईस?

ऑटोमोबाईल कंपन्यांनी एनजीटीकडून देशातील डिझेल गाड्यांमध्येचीट डिव्हाईस’ लावण्याचा प्रस्ताव पास करुन घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर फॉक्सवॅगनने 3.23 लाख गाड्यांना ‘चीट डिव्हाईस’ इंजिन लावले. मात्र, याच चीट डिव्हाईसमध्ये फेरफार केल्याने फॉक्सवॅगनला दंड ठोठावला आहे.