देशातील 56 हजार पेट्रोल पंप आज 20 मिनिटं बंद राहणार, कारण काय?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : देशातील आज जवळपास 56 हजार पेट्रोल पंप 20 मिनिटासाठी बंद राहणार आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द कंसोट्रियम ऑफ इंडियन पेट्रोल पंप डीलर्स (सीआयपीडी) च्या अंतर्गत येणाऱ्या देशातील 56 हजार पेट्रोल पंप आज संध्याकाळी 20 मिनिटासाठी बंद राहणार आहेत. पुवलवामा […]

देशातील 56 हजार पेट्रोल पंप आज 20 मिनिटं बंद राहणार, कारण काय?
Petrol And Diesel Explode
Follow us on

मुंबई : देशातील आज जवळपास 56 हजार पेट्रोल पंप 20 मिनिटासाठी बंद राहणार आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द कंसोट्रियम ऑफ इंडियन पेट्रोल पंप डीलर्स (सीआयपीडी) च्या अंतर्गत येणाऱ्या देशातील 56 हजार पेट्रोल पंप आज संध्याकाळी 20 मिनिटासाठी बंद राहणार आहेत.

पुवलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून पेट्रोल पंप संघटनेने हा निर्णय घेतला आहे. पेट्रोल पंप संध्याकाळी 7 ते 7.20 पर्यंत बंद राहणार आहेत. या दरम्यान शहिदांचे पेट्रोल पंपवर फोटो आणि बॅनर लावण्यात येणार आहे, तर लाईट बंद ठेवण्यात येणार आहे. सीआयपीडीचे प्रभारी महासचिव सुरेश कुमार यांनी लोकांनी आम्हाला सहयोग करावा असे आवाहन केले आहे.

20 मिनिटे पेट्रोल पंपवर काही काम केले जाणार नाही. पेट्रोल पंपच्या संघटनेच्या म्हणण्यानुसार आम्ही असा संदेश देत आहे की, अशा दु:खी वेळेत आम्ही देशाच्या बहादुर जवानांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत. पेट्रोल डीलर्सनेही जनतेला सहयोग करण्याचे आवाहन केले आहे.  तसेच गरज असल्यास पेट्रोल पंप बंद करण्याआधीच गाडीत पेट्रोल भरुन घ्यावे ज्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, असं ही संघटनेतर्फे सांगण्यात आलं आहे.

मागेच 14 फेब्रुवारी दरम्यान जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 44 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडे होती. हा हल्ला आत्मघातील हल्लेखोर आदिल अहमदद डार याने केला. या हल्ल्याचा सध्या संपूर्ण भारताततून निषेध केला जात आहे.