Aishwarya Rai Bachchan | ऐश्वर्या राय-बच्चन जेव्हा रेखाला आई संबोधते…

| Updated on: Nov 01, 2020 | 5:33 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आज आपला 47वा वाढदिवस साजरा करते आहे. ऐश्वर्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे, तिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा फक्त भारतातच नाहीतर जगभरात आहे.

Aishwarya Rai Bachchan | ऐश्वर्या राय-बच्चन जेव्हा रेखाला आई संबोधते...
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आज आपला 47वा वाढदिवस साजरा करते आहे. ऐश्वर्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे, तिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा फक्त भारतातच नाहीतर जगभरात आहे. अभिनयातून तिने लोकांच्या हृदयातही विशेष स्थान मिळवले आहे.बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा आणि ऐश्वर्या एकमेकांच्या खूप जवळ आहेत, त्याचे नातेही एक मुलगी आणि आई सारखेच आहे. एका अ‍ॅवॉर्ड शोमध्ये ऐश्वर्या हिने रेखाला आई म्हणून संबोधले होते. जेव्हा रेखा जज्बा या चित्रपटासाठी ऐश्वर्याला पुरस्कार देत होती, तेव्हा ऐश्वर्या म्हणाली होती की, हा पुरस्कार मला माझ्या आईकडून मिळाला आहे. यांच्यापेक्षा महत्वाचा क्षण माझ्या आयुष्यात दुसरा काय असू शकतो, हा माझ्यासाठी बहुमानच आहे. यावर रेखा उत्तर देताना म्हणाली की, अशा प्रकारचे पुरस्कार तुला जास्तीत जास्त मिळो आणि तेही माझ्या हातानेच मिळो.(When Aishwarya Rai called mother to Rekha)

रेखाने एकदा ऐश्वर्या रायला एक भावनिक पत्र लिहिले होते, ज्यात तिने ऐश्वर्याला ‘मेरी ऐश’ आणि स्वत: ला रेखाने त्या पत्रात ऐश्वर्या रायची आई म्हणून संबोधले होते. या पत्रात रेखाने ऐश्वर्याचे कौतुक केले आणि म्हटले आहे की ‘तुझ्यासारखी स्त्री नदीसारखी आहे. जी खोट्या गोष्टी बाजूला सारून सतत वाहत असते. पुढे रेखा त्या पत्रात म्हणते की, ‘तुला कुणालाही काहीही सिद्ध करायचा गरज नाही. अनेक अडथळ्यांवर विजय मिळवून तू यश मिळवले आहे.’ शेवटी पत्रात रेखा म्हणते, तु आता पर्यंत केलेल्या सर्व भूमिकांपैकी आराध्याची आई म्हणून खूप उत्तम भूमिका करत आहेस आणि ती भूमिका मला जास्त आनंद देणारी आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांनी नुकतेच कोरोनावर मात केली. अभिनेते अभिषेक बच्चन यांनी स्वत: याबाबत ट्विटरवर माहिती दिली होती. ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती अभिषेक बच्चनने दिली होती. याबाबत अभिषेक बच्चनने ट्विटरवर सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानले होते.

“आपल्या सर्वांचा आभारी आहे. मी सदैव आपल्या ऋणात राहीन. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट नगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ते घरीच आराम करतील. तर मी आणि माझे वडील सध्या रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहोत”, असं अभिषेक बच्चन यांनी सांगितलं होत.
महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 11 जुलै रोजी रात्री उशिरा समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. दोघी पितापुत्रांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती. त्यामुळे त्यांना 11 जुलै रोजी रात्री मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच 12 जुलै रोजी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आले होते.  ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या या दोघींमध्येही सुरुवातीला कोरोनाची लक्षणं नसल्याने त्यांना घरीच आयसोलेट करण्यात आलं होतं. मात्र, 17 जुलै रोजी या दोघींना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नानावटी रुग्णालयात दहा दिवस उपचारानंतर 27 जुलै ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

संबंधित बातम्या : 

Aishwarya Rai Corona | ऐश्वर्या आणि आराध्याही नानावटी रुग्णालयात दाखल

Bachchan Family Corona report: जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

(When Aishwarya Rai called mother to Rekha)