जगभरातील 10 कोरोना लस वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात, वर्षअखेर लस येण्याचा WHO चा अंदाज

| Updated on: Oct 13, 2020 | 8:42 PM

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना लस उपलब्ध होण्याबाबत मोठी माहिती दिली आहे.

जगभरातील 10 कोरोना लस वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात, वर्षअखेर लस येण्याचा WHO चा अंदाज
Follow us on

जिनेव्हा : जगभरात कोरोना विषाणूवरील लस (Corona Vaccine) उपलब्ध होण्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना लस उपलब्ध होण्याबाबत मोठी माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाच्या 10 लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. यापैकी कोणती ना कोणती लस 2020 च्या अखेरपर्यंत किंवा 2021 च्या सुरुवातीला या लस यशस्वीपणे नोंदणीकृत होईल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे (WHO Chief Scientist on Corona Vaccine availability).

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य संशोधक सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, “जगभरात जवळपास 40 कोरोना लशीचे नमुने कोणत्या ना कोणत्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीत आहेत. त्यापैकी जवळपास 10 कोरोना लस तर तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीपर्यंत पोहचल्या आहेत. हा कोरोना लस चाचणीचा अंतिम टप्पा आहे. या वैद्यकीय चाचणी लस किती प्रभावी आणि सुरक्षित असेल हे दाखवून देतात. त्यामुळे डिसेंबर 2020 किंवा 2021 च्या सुरुवातीच्या महिन्यात कोरोना लस तयार होईल अशी आशा आहे.”

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी या 10 पैकी कोणती ना कोणती लस यशस्वी होऊन वर्षअखेरपर्यंत उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

कोरोनाची आकडेवारी

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 77 लाख 24 हजार 073 पर्यंत पोहचली आहे. आतापर्यंत जगभरात 10 लाख 78 हजार 446 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 71 लाख 75 हजार 881 पर्यंत पोहचली आहे. यापैकी 8 लाख 38 हजार 729 रुग्ण कोरोना सक्रिय आहेत. 62 लाख 27 हजार 296 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे 1 लाख 9 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 55 हजार 342 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 706 जणांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

WHO ने दिली आनंदाची बातमी, कोरोनाची लस कधी येणार? यावर मोठं विधान

COVID Vaccine | कोव्हिड लस सर्वात आधी कोणाला मिळणार? डॉ. हर्ष वर्धन यांचं उत्तर

शरद पवारांना कोरोनाची लस टोचली?; डॉक्टरांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

संबंधित व्हिडीओ :

WHO Chief Scientist on Corona Vaccine availability