यूपीत गरोदर सवतेची गोळी मारुन हत्या, आरोपी महिलेला बेड्या

उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेने आपल्या सवतेची गोळ्या मारुन हत्या (UP Pregnant Women Murder) केली.

यूपीत गरोदर सवतेची गोळी मारुन हत्या, आरोपी महिलेला बेड्या
| Edited By: | Updated on: Jun 09, 2020 | 2:25 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेने आपल्या सवतेची गोळ्या मारुन हत्या (UP Pregnant Women Murder) केली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळी लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत महिला सात महिन्यांची गरोदर होती. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक (UP Pregnant Women Murder) केली आहे.

आरोपी महिलेच्या पतीने दुसऱ्या महिलेसोबत प्रेमविवाह केला होता. आरोपी महिला आणि तिची सवत या दोघी वेगवेगळ्या राहत होत्या. पतीची दुसरी पत्नी गरोदर होती. त्यामुळे संपत्तीमध्ये वाटा निर्माण होऊ शकतो, या रागातून आरोपी महिलेने सवतेची गोळ्या मारुन हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत महिला काल (8 जून) आपल्या पहिल्या पतीच्या चार वर्षाच्या मुलासोबत औषध घ्यायला बाजारात गेली होती. त्यानंतर संध्याकाळी सातच्या दरम्यान घरी परतत असताना तिच्या समोर आरोपी महिला आली. त्यानंतर आरोपी महिलेने तिच्या सवतेची गोळी मारुन हत्या केली. दरम्यान, दोन्ही महिला वेगवेगळ्या राहतात आणि पती ट्रक चालवतो.

ट्रक चालकाची पहिली पत्नी मुलांसोबत राहते. दुसरी पत्नी हरथला येथे अब्दुल्ला तिराहा जवळील विद्यानगरमध्ये भाड्याच्या घरात 2 मे पासून राहत होती.

“माझ्या पतीने दुसऱ्या महिलेसोबत प्रेमविवाह केला होता. ती सात महिन्यांची गरोदर होती. तिचा मुलगा जन्माला आला असता तर संपत्तीमध्ये वाटा निर्माण झाला असता, त्यामुळे मी तिची हत्या केली”, असं आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले.

“प्राथमिक माहितीनुसार ही घटना कौटुंबीक कारणामुळे झाल्याचा अंदाज आहे. आरोपी महिलेला आम्ही अटक केली आहे”, असं पोलिसांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

पिंपरीत 20 वर्षीय युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या

मुंबईत कोरोनाग्रस्ताची हत्या, हत्येच्या पाच दिवसांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह, आता मृतदेहच रुग्णालयातून गायब