ऐतिहासिक! आर्मीमध्ये महिलांना 20 टक्के जागा राखीव

| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

नवी दिल्ली: आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. अनेक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे, तसेच प्रत्येक क्षेत्रात आपली एक नवी ओळख निर्माण केली आहे. आता आर्मीमध्येही महिलांचा समावेश होणार आहे. याबाबतची घोषणा संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी केली. आर्मीमध्ये ग्रेडेड पद्धतीने महिलांची भरती केली जाणार आहे. सुरुवातीला 20 टक्के महिलांची भरती करण्यात येणार […]

ऐतिहासिक! आर्मीमध्ये महिलांना 20 टक्के जागा राखीव
Follow us on

नवी दिल्ली: आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. अनेक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे, तसेच प्रत्येक क्षेत्रात आपली एक नवी ओळख निर्माण केली आहे. आता आर्मीमध्येही महिलांचा समावेश होणार आहे. याबाबतची घोषणा संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी केली.

आर्मीमध्ये ग्रेडेड पद्धतीने महिलांची भरती केली जाणार आहे. सुरुवातीला 20 टक्के महिलांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती निर्मला सीतारमन यांनी दिली. मागील वर्षी लष्कराचे प्रमुख विपिन रावत यांनी महिलांची भरती आर्मीमध्ये करण्यात यावी अशी शिफारस केली होती.


आर्मीमध्ये महिलांचा समावेश करण्यासाठी निर्मला सीतारमन यांनी पहिल्यांदा आर्मीच्या पीबीओआर ( पर्सनल बिलो ऑफिसर रँक) च्या भूमिकेत महिलांचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

“महिलांना आर्मीमध्ये टप्प्या टप्प्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. जेणेकरुन  भारतीय लष्करात त्यांची संख्या 20 टक्के होईल. गरज पडल्यास बलात्कार आणि छेडछाड सारख्या प्रकरणांमध्येही महिला पोलिसांना तपास करता येणार आहे. आता लवकरच महिलांना आर्मीमध्ये भरती केले जाणार आहे”, असं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले.

यासाठी आर्मी आपल्या पोलीस दलात कमीत कमी 800 महिलांचा समावेश करणार आहे. तसेच प्रत्येकवर्षी 52 महिलांना आर्मीमध्ये भरती केले जाणार आहे.