कल्याण स्टेशनवर शॉर्टकट मारण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू, स्ट्रेचरवरुन मृतदेह रुग्णालयात

| Updated on: Jan 08, 2020 | 8:25 PM

शॉर्टकटच्या चक्करमध्ये एका तरुणीचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू (Girl accident on kalyan station) झाला आहे. ही घटना आज (8 जानेवारी) कल्याण स्थानकाजवळ घडली.

कल्याण स्टेशनवर शॉर्टकट मारण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू, स्ट्रेचरवरुन मृतदेह रुग्णालयात
Follow us on

ठाणे : शॉर्टकटच्या चक्करमध्ये एका तरुणीचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू (Girl accident on kalyan station) झाला आहे. ही घटना आज (8 जानेवारी) कल्याण स्थानकाजवळ घडली. विशेष म्हणजे अॅम्बुलन्स नसल्याने तरुणीचा मृतदेह स्ट्रेचरवर हॉस्पिटलपर्यंत नेण्यात आला. त्यामुळे कल्याण रेल्वे स्टेशनवर सोयी सुविधा नसल्याचे समोर आलं आहे. अंतिमा दुबे असं या मृत तरुणीचं (Girl accident on kalyan station) नाव आहे.

कल्याण स्टेशनवर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अंतिमा कल्याण पूर्वेकडील साकेत कॉलेजमध्ये जात होती. यावेळी शॉर्टकटच्या चक्करमध्ये तिने रेल्वेचा रुळ ओलांडला यावेळी मागून येणाऱ्या ट्रेनची धडक तिला बसली. या धडकेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अंतिमा ही कल्याण पश्चिमेतील सांगळेवाडी परिसरात राहते. सांगळेवाडी ते कल्याण स्टेशन पर्यंत रेल्वेने भिंत बांधली आहे. मात्र काही ठिकाणी भिंत नसल्याने तेथील रहिवाशी तेथून शॉर्टकट मारत रेल्वे रुळ ओलांडतात. त्यामुळे रेल्वेने जो पर्यायी रस्ता बंद केला आहे तो उघडून भिंतीचे काम पूर्ण केले पाहिजे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर मयत तरुणीचा मृतदेह ट्रॅकवरून रुक्मिणीबाई हॉस्पिटलपर्यंत स्ट्रेचरवरून नेण्यात आला. आतापर्यंत अनेक मृतदेह अॅम्बुलन्स नसल्याने हमालांच्या मदतीने रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले आहेत. कल्याण रेल्वे पोलिसांनी अॅम्बुलन्स उपलब्ध करण्यासाठी स्टेशन प्रबंधकांना वेळोवेळी मागणी केली आहे. पण आतापर्यंत रेल्वेने अॅम्बुलन्स उपलब्ध केलेली नाही.