येत्या काळात युवासेना गल्लोगल्ली पोहोचली पाहिजे; आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

| Updated on: Jun 13, 2021 | 3:20 PM

त्यांनी मिठी नदीवरुन सत्ताधारी शिवसेनेवर आरोप करणाऱ्या विरोधकांनाही प्रत्युत्तर दिले. विरोधक हे विनाकारण राजकारण करत आहेत. त्यांनी राजकारण न करता संकटकाळात एकत्र येऊन काम करावे, असे मंगेश कुडाळकर यांनी म्हटले. | Aaditya thackeray

येत्या काळात युवासेना गल्लोगल्ली पोहोचली पाहिजे; आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री
Follow us on

मुंबई: येत्या दोन वर्षांमध्ये युवासेना ही गल्लीगल्लीत पोहोचली पाहिजे, असे आदेश राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी रविवारी यासंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी मिठी नदीवरुन सत्ताधारी शिवसेनेवर आरोप करणाऱ्या विरोधकांनाही प्रत्युत्तर दिले. विरोधक हे विनाकारण राजकारण करत आहेत. त्यांनी राजकारण न करता संकटकाळात एकत्र येऊन काम करावे, असे मंगेश कुडाळकर यांनी म्हटले. (Aaditya thackeray birthday celebration by Shivsena in Mumbai)

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांच्याकडून गोरगरिबांना 5000 किलो धान्याचे वाटप करण्यात आले. युवासेनेचे नेते कार्तिक स्वामी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत स्वस्तात पेट्रोलवाटप

राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून माफक दरात पेट्रोल वाटप केले जात आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांची चांगलीच चांदी झाली आहे. डोंबिवलीच्या उस्मा पेट्रोल पंपावर अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. सध्या मुंबईसह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 100 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्या होत्या.

मुंबईत युवासेनेकडून मोफत कोरोना लस

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मोफत लस देण्याचा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी कोरोना लस टोचून घेतली.

(Aaditya thackeray birthday celebration by Shivsena in Mumbai)