सण-उत्सव पाहून मासिक पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेताय? थांबा! 18 वर्षीय तरुणीने गमावला जीव

मासिक पाळी पुढे जाण्यासाठी अनेक महिला गोळ्या घेतात. पण या गोळ्यांमुळे डीप व्हेन थ्रोम्बोसिस हा एक गंभीर वैद्यकीय आजार होता. ज्यामध्ये खोलवर असलेल्या रक्तवाहिनीत रक्ताची गाठ तयार होते. यावर लवकर उपचार घेणे हा एकमेव उपाय आहे.

सण-उत्सव पाहून मासिक पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेताय? थांबा! 18 वर्षीय तरुणीने गमावला जीव
Eating Pills
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 23, 2025 | 12:50 PM

आपल्या देशात प्रत्येक सण हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण सणच्या आधी महिलांना एक वेगळेच टेन्शन असतं. ते म्हणजे मासिक पाळीचे. आजही अनेक धार्मिक कार्यात किंवा शुभकार्यांमध्ये महिलांना मासिक पाळी आली तर त्या जात नाही. काही महिला तर अशा वेळी आधीच त्याच्यावर पर्याय शोधतात. मासिक पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का या गोळ्यांमुळे गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी वेळीच सावध व्हायला हवे. या गोळ्या घेतल्यामुळे तर एका 18 वर्षीय मुलीचे निधन झाले आहे. याबाबत स्वत: डॉक्टरांनी माहिती दिला आहे.

14 ऑगस्ट रोजीच्या रिबूटिंग द ब्रेन पॉडकास्टच्या भागात, व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. विवेकानंद यांनी न्यूरोसर्जन डॉ. शरण श्रीनिवासन यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) या आजारामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल बोलणे झाले. डॉ. विवेकानंद यांनी एका 18 वर्षीय मुलीच्या वैद्यकीय प्रकरणाचा उल्लेख केला, जिच्या पायात तीव्र वेदना आणि सूज होती. नंतर तिचा मृत्यू झाला. तिला उपचार उशिरा मिळाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वाचा: 5 बायका, 12 लफडी… तरीही एकाकी होऊन मेला हा बॉलिवूडचा महाखतरनाक व्हिलन, मृतदेहही सडला…

‘मासिक पाळी थांबवण्याच्या गोळ्यांमुळे 18 वर्षीय मुलीचा जीव गेला’

त्यांनी सांगितले की, त्या मुलीला डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT)या आजाराचे निदान झाले होते, ज्यामध्ये तिच्या नाभीपर्यंत जवळजवळ रक्ताची गाठ झाली होती. डॉ. विवेकानंद यांनी सांगितले की, ही स्थिती तिच्या धार्मिक समारंभासाठी मासिक पाळी थांबवण्यासाठी घेतलेल्या हार्मोनल गोळ्यांशी संबंधित होती. डॉक्टरांनी तात्काळ दाखल करून उपचार करण्याची शिफारस केली होती, परंतु तिच्या वडिलांनी याला उशीर केला आणि सांगितले की तिची आई दुसऱ्या दिवशी सकाळी येईल. डॉ. विवेकानंद यांनी आठवण करून दिली की त्या मुलीला त्या रात्री उशिरा आपत्कालीन विभागात आणले गेले, तेव्हा ती श्वास घेत नव्हती.

‘मला पहाटे 2 वाजता फोन आला’

ते पुढे म्हणाले, “मला एक दु:खद कहाणी सांगायची आहे, एका 18 वर्षीय मुलीची. ती क्लिनिकला नाही, तर रुग्णालयात तिच्या मित्रांसह आली होती, तिचे पालक तिथे नव्हते. तिला पायात वेदना, पायाला सूज होती, फक्त पायालाच नाही तर मांडीपर्यंत. ती अस्वस्थ होती, वेदनांमध्ये होती. हे कधी सुरू झाले? ती म्हणाली, ‘मला पूजेसाठी मासिक पाळी थांबवण्यासाठी काही हार्मोनल गोळ्या घ्याव्या लागल्या.’ आणि ही अशी स्थिती आहे जी डीप व्हेन थ्रोम्बोसिसला कारणीभूत ठरते, हा एक मोठ संकट ओठावून घेणारा घटक आहे. कधीकधी असे होते. आम्ही स्कॅन केले, तेव्हा रक्ताची गाठ जवळजवळ नाभीच्या पातळीपर्यंत, म्हणजे कॉमन इलियाक व्हेनपर्यंत होती. आणि (तिने गोळी) फक्त 3 दिवस घेतली होती. मी तिच्या कुटुंबातील कोणाशी तरी किंवा डॉक्टर असलेल्या व्यक्तीशी बोलण्याचा आग्रह धरला, शेवटी मी तिच्या वडिलांशी बोललो, ज्यांना मी सांगितले, ‘तिला दाखल करणे आणि उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे.’ त्यावर ते म्हणाले, ‘डॉक्टर, तिची आई म्हणते की, उद्या सकाळी मी येईन आणि मग आम्ही तुम्हाला भेटू.’”

‘खूप उशीर झाला’

या प्रकरणाचा उल्लेख रिबूटिंग द ब्रेनच्या 17 ऑगस्टच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये करण्यात आला आहे. “डॉ. विवेकानंद यांनी डॉ. शरण श्रीनिवासन यांच्याशी एक हृदयद्रावक कहाणी शेअर केली. एका 18 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीची, जी पाय आणि मांडीच्या वेदना, अस्वस्थता आणि हार्मोनल गोळ्यांच्या वापराच्या इतिहासासह आली होती. तिने गोळ्या घेण्यास सुरुवात केल्यानंतर तीन दिवसांनी पूजा केली होती, पण लवकरच तिला गंभीर स्थिती उद्भवली. डॉक्टरांनी दाखल करण्याचा आग्रह धरला, तरीही कुटुंबाने संकोच केला, तिच्या आईने सांगितले की ती दुसऱ्या दिवशी सकाळी येईल. पहाटे 2 वाजता, खूप उशीर झाला होता. एका तरुण मुलीला जीव गमावावा लागला. ही एक वेदनादायक घटना होती.”