ओठांनाही स्क्रबिंग…तर मऊ आणि गुलाबी ओठ मिळवण्यासाठी ‘हे’ 3 सोपे घरगुती स्क्रबचा करा वापर

प्रत्येकाला गुलाबी ओठ हवे असतात आणि यासाठी ओठांची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. त्वचेच्या काळजीमध्ये स्क्रबिंग हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे जो घाण, मृत त्वचा तसेच पिगमेंटेशन काढून टाकण्यास मदत करतो. या लेखात, आपण ओठांसाठी नैसर्गिक घटकांपासून बनवलेले हे तीन घरगुती स्क्रबबद्दल जाणून घेऊ.

ओठांनाही स्क्रबिंग...तर मऊ आणि गुलाबी ओठ मिळवण्यासाठी हे 3 सोपे घरगुती स्क्रबचा करा वापर
| Edited By: | Updated on: Jun 12, 2025 | 3:05 PM

आपण नेहमी त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक घरगुती उपायांचा वापर करत असतो. पण त्याच बरोबर आपण ओठांचीही खूप काळजी घेतली पाहिजे. कारण प्रत्येकाला मऊ आणि गुलाबी ओठ हवे असतात. त्यात ओठांची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे धूळ, प्रदूषण आणि सूर्यप्रकाशामुळे ओठांवर पिगमेंटेशनची समस्या निर्माण होते. अशातच अनेकजण निरोगी त्वचा मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा त्यांच्या संपूर्ण चेहऱ्याची त्वचा एक्सफोलिएट करतात. मात्र ओठांकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे ओठांवर मृत त्वचा जमा होते आणि हळूहळू पिगमेंटेशनची समस्या वाढू लागते. गुलाबी ओठांसाठी तुम्ही योग्य काळजी घेतल्यास ओठ सुंदर ठेवता येतात. त्यासाठी काही सोपे टिप्स फॉलो केल्याने ओठांना गुलाबी रंग प्राप्त होण्यासाठी या नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेले स्क्रब वापरणे योग्य ठरेल. चला तर मग आजच्या या लेखात आपण या तीन घरगुती स्क्रबबद्दल जाणून घेऊयात…

स्क्रब तुमच्या त्वचेवरील घाण काढून टाकते आणि छिद्रे खोलवर साफ करते. स्क्रबिंग केल्याने मृत त्वचेच्या पेशी काढल्या जातात, ज्यामुळे पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या उद्भवत नाही. अशातच तीन स्क्रबबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या ओठांमधील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतील आणि हळूहळू पिगमेंटेशन देखील कमी होण्यास मदत करतील, ज्यामुळे तुम्हाला गुलाबी ओठ मिळण्यास मदत होईल.

हे स्क्रब तुमच्या ओठांना हायड्रेट करेल

ओठांना एक्सफोलिएट करण्यासाठी घरगुती स्क्रबबद्दल बोलायचे झाले तर, एक चमचा मध घ्या, त्यात काही थेंब नारळाचे तेल आणि थोडी कॉफी पावडर टाकून याची पेस्ट तयार करा, या पेस्टने हलक्या हातांनी गोलाकार हालचालीत ओठांना मसाज करा. कॉफीमुळे मृत त्वचा देखील निघून जाईल आणि रक्ताभिसरण देखील सुधारेल, मध आणि नारळ त्वचा ओठांना मऊ ठेवण्याचे काम करतात.

काकडीच्या रसाने स्क्रब बनवा

काकडी उन्हाळ्यात अन्नापासून ते त्वचेपर्यंत खूप फायदेशीर घटक आहे. तर काकडी तुमच्या कोरड्या ओठांना हायड्रेट करेल. काकडीच्या रसात गुलाबपाणी, दोन ते तीन थेंब लिंबाचा रस आणि कोरफडीचा गर मिक्स करा. त्यात थोडी बारीक साखर टाका आणि नंतर हलक्या हाताने ओठांना हे मिश्रण लावून स्क्रब करा. यामुळे तुमच्या ओठांचा रंगही सुधारेल.

लिंबाचा रस आणि साखर

व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले लिंबू त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. लिंबाच्या रसात साखर मिक्स करा आणि त्यात ऑलिव्ह किंवा नारळाचे तेल टाका. आता हे स्क्रब तुमच्या ओठांवर एक ते दीड मिनिटांसाठी गोलाकार हालचालीत मालिश करून लावा आणि नंतर ओठ स्वच्छ करा.

मॉइश्चरायझिंग आवश्यक आहे

स्क्रबिंग केल्यानंतर ओठांना मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत असा लिप बाम वापरा जो त्वचेला यूव्ही किरणांपासून वाचवतो. कारण सुर्यप्रकाशाच्या तीव्र उष्णतेमुळे सुद्धा पेगमेंटेशनची समस्या निर्माण होते असते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)