
आपल्या भारतीय जेवणात वेगवेगळ्या पदार्थांच्या चटण्या बनवल्या जातात. तसेच चटणी शतकानुशतके भारतीय अन्नाचा एक भाग आहे. कोणत्याही जेवणासोबत थोडीशी चटणी त्या जेवणाची चव वाढवते. पण तुम्हाला माहिती आहे का की चटणी केवळ चव वाढवण्यासाठीच फायदेशीर नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
स्वयंपाकघरात असलेल्या काही पदार्थांपासून चटण्या तयार केल्या जातात ज्यामध्ये प्रथिने भरपूर असतात. त्यामुळे या चटण्याची चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चला तर मग आजच्या या लेखात आपण अशा 5 प्रथिनेयुक्त चटण्यांबद्दल जाणून घेऊया, ज्या तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.
शेंगदाण्याची चटणी
शेंगदाण्याची चटणी ही प्रथिने, हेल्दी फॅट आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहेत. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ आणि थोडा लिंबाचा रस मिक्स करून मिक्समध्ये बारीक करा. तर या चटणीत तुम्ही जिरे किंवा धणे पावडर टाकून चव देखील वाढवू शकता. ही चटणी पराठे, डाळ-भात किंवा इडली-डोशासोबत छान लागते.
शेंगदाण्यामध्ये असलेले प्रथिने स्नायूंच्या निर्मितीस मदत करतात . तसेच शेंगदाण्याची चटणी शरीरात ऊर्जा वाढवतेआणि वजन नियंत्रित करण्यास मदत करते.
मुग डाळ चटणी
मूग डाळ ही पचायला हलकी असते आणि त्यात प्रथिने भरपूर असतात. तर तुमच्या रोजच्या आहारात मुगडाळीची चटणींचा समावेश करा. चटणी बनवण्यासाठी भिजवलेल्या मूग डाळीत हिरवी मिरची, आले, मीठ आणि कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्या. चवीसाठी थोडा लिंबाचा रस टाकून चटणी खाण्यास तयार आहे.
मूग डाळीमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले अमीनो आम्ल असतात, आणि हेच आम्ल पचनक्रिया निरोगी ठेवते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
नारळ-उडीद डाळ चटणी
नारळ-उडीद डाळ चटणी दक्षिण भारतात खूप लोकप्रिय आहे. ती बनवण्यासाठी भाजलेली उडीद डाळ, नारळ, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मीठ टाकून सर्व मिश्रण बारीक वाटले जाते. ही चटणी इडली किंवा डोसा सोबत सर्व्ह करता येते.
उडदाची डाळ ही प्रथिने आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. तसेच, नारळामध्ये असलेले निरोगी चरबी मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
चणाडाळ चटणी
चणाडाळीमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात. त्याची चटणी बनवण्यासाठी भाजलेली चणा डाळ, लसूण, हिरवी मिरची, आले आणि मीठ टाकून मिश्रण बारीक वाटून घ्या. त्यानंतर या चटणीमध्ये फोडणी घालून चव वाढवता येते.
चणा डाळमध्ये भरपूर फायबर असते, जे पोटासाठी चांगले असते. तसेच, ते हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.
तीळाची चटणी
तीळांमध्ये कॅल्शियम, लोह आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्याची चटणी बनवण्यासाठी भाजलेले तीळ, लसूण, हिरवी मिरची आणि मीठ टाकून मिश्रण बारीक वाटून घ्या. या चटणीचे सेवन करताना तुम्ही यात गूळ मिक्स करून देखील खाऊ शकता. तीळ हाडे मजबूत करते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास देखील मदत करते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)