
प्रत्येक ऋतूमध्ये हवामानातील बदलांचा त्वचेवरही परिणाम होतो. कारण उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात अचानकपणे वातावरणात बदल होतो. कारण पावसाळयात वातावरण थंड राहते. अशा ऋतूमध्ये वातावरणाच्या अचानक बदलामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. तर या काळात त्वचेच्या ॲलर्जीची समस्या देखील वाढते. या ऋतूत त्वचा जास्त तेलकट होते त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे, पुरळ, ब्लॅकहेड्स यासारख्या समस्या सतावू शकतात. तर या सर्व समस्या टाळण्यासाठी त्वचेची स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय स्किन केअर रूटिंगमध्ये काही नैसर्गिक घटकांचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे या काळात त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.
नैसर्गिक घटकांचा वापर तुमच्या त्वचेवर हळूहळू परिणाम दाखवतात, अशातच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रोडक्टपेक्षा नैसर्गिक उपाय चांगले मानले जातात, कारण या गोष्टी कॅमिकलमुक्त असतात आणि त्यामुळे त्वचेला नुकसान होण्याची शक्यता देखील नगण्य असते. चला तर मग जाणून घेऊया अशा 5 घटकांबद्दल जे पावसाळ्यात त्वचेची काळजी घेतील.
कडुलिंब हा एक अद्भुत घटक
फळांपासून ते पानांपर्यंत आणि सालीपर्यंत, कडुलिंबाचे झाड औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे आणि पावसाळ्यात त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी ते रामबाण उपायापेक्षा कमी नाही. जर तुमच्या त्वचेवर पुरळ किंवा मुरुमे येत असतील तर तुम्ही कडुलिंबाच्या पानांची पेस्ट लावू शकता. तसेच पाने उकळून त्या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेची ॲलर्जी देखील टाळता येतात. याशिवाय पावसाळ्यात होणाऱ्या पुरळ आणि मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी कडुलिंब औषध म्हणून काम करते.
कोरफडीचा वापर करा
कोरफड जेल त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी मानला जात नाही. कारण यामध्ये असलेले हायड्रेटिंग आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पावसाळ्यात तुमच्या त्वचेला बरे करण्यास तसेच ॲलर्जी कमी करण्यास प्रभावी आहेत. कोरफड जेल थेट चेहऱ्यावर देखील लावता येते, परंतु जर त्वचा संवेदनशील असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्किन केअरमध्ये काकडीचा समावेश करा
जर तुम्हाला पावसाळ्यात तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल, तर तुमच्या स्किन केअर रूटिंगमध्ये काकडीचा समावेश करा. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे निस्तेज झालेली त्वचेचा पुन्हा चांगली करण्यासाठी काकडीचा उपाय उत्तमरित्या काम करते. तुम्ही काकडीचा रस कोरफड जेल, मुलतानी माती इत्यादींसोबत मिक्स करून त्वचेवर फेसपॅक तयार करून लावू शकता, ज्यामुळे त्याचे फायदे आणखी वाढतात. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी काकडी देखील प्रभावी आहे. जर टॅनिंग झाली असेल तर काकडीचा रस टोमॅटोच्या रसात किंवा लिंबाच्या तीन ते चार थेंब मिक्स करून लावल्याने त्वचेचा टॅन कमी होतो.
बेसन अतिरिक्त तेल काढून टाकते
तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी पावसाळ्यात त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी बेसन वापरणे चांगले. यामुळे चेहऱ्यावरील चिकटपणा कमी होतो आणि त्वचा फ्रेश दिसते. तर बेसन हे स्क्रब म्हणून देखील काम करते, जे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि ब्लॅकहेड्सची समस्या कमी करते.
गुलाबपाणी तुमची त्वचा ताजी ठेवेल
तुमच्या पावसाळ्यातील स्किन केअर रूटिंगमध्ये गुलाबपाण्याचा समावेश अवश्य करा. ते तुमच्या निस्तेज त्वचेला नवीन जीवन देतील आणि तुमचा चेहरा फ्रेश राहील आणि रंग सुधारण्यास देखील प्रभावी आहे. यासाठी तुम्ही गुलाबपाणी टोनर म्हणून वापरू शकता. तुम्ही त्याचा स्प्रे तुमच्यासोबत ठेवू शकता आणि वेगवेगळ्या फेस पॅकमध्ये मिक्स करून ते लावू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)