
पावसाळा म्हणजे थंड वारे, ताजेपणा आणि निसर्गाचा आनंद! मात्र यासोबतच सौंदर्याची काळजी घेणाऱ्यांसाठी काही चॅलेंजेसही येतात. विशेषतः महिलांना यामध्ये सर्वात त्रास होतो तो लिपस्टिक लावल्यावर लगेचच तिच्या फिकट होण्याचा किंवा पसरण्याचा. पार्टीला जाताना किंवा ऑफिस मीटिंगमध्ये एखाद्या खास क्षणी लिपस्टिक अचानक निस्तेज झाली, तर पूर्ण लुकच बिघडतो आणि कॉन्फिडन्सवरही परिणाम होतो.
मात्र आता घाबरण्याची गरज नाही. काही घरगुती आणि प्रोफेशनल टिप्स अंगिकारल्या तर तुमची लिपस्टिक पावसाळ्यातसुद्धा संपूर्ण दिवस राहील तशीच सुंदर, फ्रेश आणि टिकाऊ. जाणून घ्या 6 अशा जादुई ट्रिक्स ज्या तुमच्या सौंदर्याला पावसातसुद्धा दामटून ठेवतील.
1. पावसाळ्यातील दमट हवामानामुळे ओठ ड्राय आणि पीलिंग होतात. त्यामुळे लिपस्टिक नीट बसत नाही. यासाठी घरगुती स्क्रब वापरावा साखर आणि मध एकत्र करून ओठांवर हलक्या हाताने स्क्रब करा. यानंतर लिप बाम लावून हायड्रेट करा आणि काही वेळाने टिश्यूने एक्स्ट्रा बाम पुसा. यामुळे ओठ सॉफ्ट होतील आणि लिपस्टिक दीर्घकाळ टिकेल.
2. लिप लाइनर केवळ ओठांना आकार देतो असं नाही, तर लिपस्टिक पसरू नये यासाठीही उपयोगी ठरतो. ओठांच्या कडेने लाइनरने एक सौम्य सीमा तयार करा आणि त्याच लाइनरने थोडा आतपर्यंत रंग भरून टाका. यामुळे लिपस्टिक हलकी झाली तरी ओठ कोरे वाटणार नाहीत.
3. लिपस्टिक लावल्यानंतर टिश्यू पेपर ओठांवर ठेवून त्यावर हलकासा ट्रान्सलुसंट पावडर ब्रशने लावा. मग पुन्हा एक थर लिपस्टिक लावा. या डबल लेयर तंत्रामुळे लिपस्टिक अधिक चांगली सेट होते आणि पावसातही फिकट होत नाही.
4. ग्लॉसी किंवा क्रीमी लिपस्टिक पावसात लवकर पसरते. पण मॅट फॉर्म्युला लिपस्टिक लवकर सेट होते आणि जास्त वेळ टिकते. मॅट नसल्यास, नॉर्मल लिपस्टिकनंतर टिश्यूने एक्स्ट्रा प्रोडक्ट काढा आणि थोडी पावडर लावा तुमचं मॅट फिनिश तयार!
5. बाहेर कामासाठी सतत फिरावं लागणार असल्यास, लिपस्टिक सीलर वापरा. लिपस्टिक लावल्यानंतर सीलर लावून सुकू द्या. हे प्रोडक्ट लिपस्टिकला पाण्यापासून आणि दमट हवामानापासून सुरक्षित ठेवेल.
6. लिक्विड लिपस्टिक किंवा लिप टिंट लवकर सेट होतात आणि नैसर्गिक फिनिशसाठी योग्य असतात. लावल्यानंतर टिश्यूने सौम्यपणे दाबा यामुळे ओठांचा लुक नैसर्गिक आणि सुंदर दिसेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)