99% लोकं कलिंगड खाताना करतात ‘ही’ चूक, जाणून घ्या आयुर्वेदात सांगितलेल्या काही महत्वाच्या गोष्टी

कलिंगड हे केवळ पाण्यानेच नव्हे तर जीवनसत्त्वे आणि खनिजांनीही समृद्ध आहे. या हंगामी फळाचे सेवन तुमच्या आरोग्याला खरे फायदे मिळतात. यासाठी कलिंगड खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.कारण कलिंगड खाताना 99 टक्के लोकांकडून एक सामान्य चूक होते. कोणती आहे ही चूक ते जाणून घेऊयात.

99% लोकं कलिंगड खाताना करतात ही चूक, जाणून घ्या आयुर्वेदात सांगितलेल्या काही महत्वाच्या गोष्टी
| Updated on: Apr 08, 2026 | 5:15 PM

उन्हाळ्यात पोट थंड ठेवण्यासाठी आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी आपल्या आहारात हंगामी फळांचा समावेश करतो. आंबा, लिची, कलिंगड,पीच आणि आलुबुखारा यांसारखी फळे या हंगामात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. कलिंगड हे असेच एक फळ आहे ज्यात अंदाजे 91 टक्के पाणी असते. म्हणूनच शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ते चांगले मानले जाते. अनेक पोषक तत्वांव्यतिरिक्त त्यात नैसर्गिक साखर असते जी त्वरित ऊर्जा प्रदान करते. मात्र हे फळ खाताना तुम्ही फक्त ही एक चूक केल्यास ते फायद्याऐवजी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

अशातच योगाचार्य उमंग त्यागी हे अनेकदा निरोगी राहण्याबद्दल टिप्स देतात. तर यावेळी त्यांनी त्यांच्या सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी लोकं कलिंगड खाताना कोणत्या सामान्य चुका करतात आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती, हे ते स्पष्ट सांगितलेलं आहे. तसेच ते कलिंगडाचे फायदे आणि ते खाण्याचे तीन नियमही सांगतात. चला तर मग आजच्या लेखात आपण कलिंगड खाताना कोणती एक चूक करतो ज्यांने आपल्या आरोग्यासाठी धोकदायक ठरू शकते तसेच कलिंगड कोणत्या पद्धतीने खाल्ले पाहिजे ते जाणून घेऊयात.

आयुर्वेदानुसार या प्रकारे कधीच कलिंगडाचे सेवन करू नका.

रिकाम्या पोटी टरबूज खाणे

पचनास नुकसान

आयुर्वेदानुसार कलिंगड जड आणि थंड असते. रिकाम्या पोटी कलिंगड खाल्ल्याने जठरअग्नी शमतो,ज्यामुळे पचनक्रिया कमजोर होते. यामुळे न पचलेल्या अन्नामुळे शरीरात तयार होणारा टाकाऊ पदार्थ/विष निर्माण होतो. ज्यामुळे तुम्हाला जडपणा, सुस्ती आणि थकवा जाणवणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

रक्तातील साखर वाढू शकते

रिकाम्या पोटी कलिंगड खाल्ल्यास तुमच्या शरीराच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. आधुनिक विज्ञानानुसार कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स 72 ते 76 पर्यंत असू शकतो, त्यामुळे मधुमेहींनी विशेषतः ते मर्यादित प्रमाणात खावे आणि रिकाम्या पोटी खाणे टाळावे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, 100 ग्रॅम टरबूजमध्ये 1.21ग्रॅम सुक्रोज, 1.58 ग्रॅम ग्लुकोज आणि 3.36 ग्रॅम फ्रुक्टोज असते. यांची बेरीज केल्यास एकूण नैसर्गिक साखर 6.15 ग्रॅम होते. यासाठी खास ज्यांना मधुमेंहाचा त्रास आहे त्यांनी कलिंगडाचे सेवन टाळावे.

99 टक्के लोकं करतात ही चूक

कलिंगड खाताना होणारी एक सामान्य चूक म्हणजे, एप्रिल महिन्यातच म्हणजेच उन्हाळा ऋतू सुरू होताच कलिंगड खाण्यास सुरुवात करतात. आयुर्वेदानुसार कलिंगड हे उन्हाळी फळ आहे, त्यामुळे मे महिन्याचा मध्य उलटल्यानंतरच कलिंगड खाल्ले पाहिजे. कारण मार्च आणि एप्रिलमध्ये बाजारात मिळणारी कलिंगडे ही ऑफ-सीझन फळे असतात आणि या वेळी आपले शरीर ती पचवण्यासाठी तयार नसते. त्यामुळे तुमच्या शरीराला पचनाच्या समस्या व इतर आरोग्याच्या समस्या सतावू लागतात.

कलिंगड कसे खावे?

कलिंगड हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि पित्त शांत करण्यास आरोग्यदायी फळ आहे. आयुर्वेदानुसार कलिंगड उन्हाळ्यासाठी अमृतापेक्षा कमी नाही. यासाठी तीन नियमात याचे सेवन केल्यास ते तुमच्या शरीरासाठी खूप फायद्याचे ठरेल. तर पाहिला नियम म्हणजे मे महिन्याच्या मध्यांतरानंतर कलिंगड खावे. दुसरा सकाळी 11 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान खावे. तिसरा नियम कलिंगडाचे सेवन करताना कधीच दूध, दही किंवा कोणत्याही जड पदार्थासोबत खाऊ नये.

थंड कलिंगड खाणे

बाजारातून कलिंगड आणल्यावर आपल्यापैकी अनेकजण ते फ्रिजमध्ये ठेवून थंड झाल्यावर त्याचे सेवन करतात.पण असे कलिंगडाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. ज्येष्ठ आहारतज्ञ सांगतात की फ्रिजमध्ये ठेवून थंड कलिंगड खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते, घसा खवखवणे, सर्दी आणि खोकला होऊ शकतो, तसेच शरीराचे तापमान बिघडू शकते. यासाठी कलिंगड विकत घेतल्यानंतर ते खाण्यापूर्वी किमान 30 मिनिटे ते 1 तास सामान्य तापमानाच्या पाण्यात भिजवून ठेवा. जेणेकरून या हंगामी फळाचा तुमच्या आरोग्याला पुरेपूर फायदा होईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us