AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजा शिवाजी’मधील जिजाऊंच्या भूमिकेबद्दल भाग्यश्रीने सोडलं मौन; म्हणाली ‘वयाने मोठी..’

अभिनेत्री भाग्यश्रीने 'राजा शिवाजी' या चित्रपटात राजमाता जिजाबाईंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडलं आहे. रितेश देशमुखच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.

'राजा शिवाजी'मधील जिजाऊंच्या भूमिकेबद्दल भाग्यश्रीने सोडलं मौन; म्हणाली 'वयाने मोठी..'
Bhagyashri in Raja ShivajiImage Credit source: Instagram
| Updated on: May 25, 2026 | 9:36 AM
Share

अभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मोठी फौज पहायला मिळते. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री भाग्यश्रीसुद्धा ‘राजा शिवाजी’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. भाग्यश्रीने यामध्ये रितेश देशमुखच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारली आहे. राजमाता जिजाबाईंच्या भूमिकेत तिने दमदार काम केलं आहे. रितेश आणि भाग्यश्री यांच्या वयात फक्त दहा वर्षांचंच अंतर आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाग्यश्रीने ही भूमिका स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं आहे.

‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्री म्हणाली, “ज्या भूमिकेच्या कथा तुम्ही लहानपणापासून ऐकल्या आहेत, ती भूमिका साकारण्याची संधी जेव्हा तुम्हाला मिळते, तेव्हा ती नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. मला माझ्यापेक्षा फक्त दहा वर्षांनी लहान असलेल्या रितेशच्या आईची भूमिका साकारायला काहीच अडचण आली नाही. संतोष सिवन सरांनी मला फोन करून सांगितलं की, सॉरी, मला कॅमेऱ्याच्या विशिष्ट अँगलने आणि लाइट्सच्या सेटिंग्सने तुम्हाला थोडं वयस्कर दाखवावं लागलं. पण तुम्ही अजूनही खूप तरुण दिसता. ही एक अशी प्रशंसा आहे, जी मी नेहमी माझ्या हृदयात जपून ठेवीन. कारण ते प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन आहेत.”

57 वर्षीय भाग्यश्रीने तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अशी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारली आहे. 1990 च्या दशकात सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून ती रातोरात स्टार बनली होती. मात्र हिमालय शिवदासानीसोबत लग्न केल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्री सोडली होती. तीन वर्षांनंतर ती पुन्हा चित्रपटांमध्ये परतली आणि ‘त्यागी’, ‘कैद में है बुलबल’, ‘घर आया मेरा परदेसी’, ‘पायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. भाग्यश्रीने मराठी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलंय.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा