उन्हाळा सुरू होताच अशा प्रकारे करा फ्रिजचा वापर, थंडवा वाढवून वीजेचीही होईल बचत

उन्हाळा सुरू होताच फ्रिजच्या योग्य सेटिंग आणि वापराकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण प्रत्येक ऋतूनुसार फ्रिजचे आतील तापमान हे सेंट करावे लागते जेणेकरून पदार्थ चांगले राहतील. तर हे काही सोपे बदल करून तुम्ही योग्य तापमान राखून फ्रिजचे कूलिंग सुधारू शकता.

उन्हाळा सुरू होताच अशा प्रकारे करा फ्रिजचा वापर, थंडवा वाढवून वीजेचीही होईल बचत
Summer Fridge Setting
| Edited By: | Updated on: Mar 09, 2026 | 11:45 PM

उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे अनेक घरांमध्ये आता फ्रिजमध्ये थंड पाणी ठेवण्यास सुरूवात झाली आहे. त्यासोबतच उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे थंड पेय, फळे आणि थंड पदार्थ ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरचा वापर सतत चालू राहतो. मात्र कधीकधी चुकीच्या सेटिंग्जमुळे फ्रिजच्या आतील तापमान लवकर थंड होत नाही. अशावेळेस काही सोपे बदल त्यांची कार्यक्षमता सुधारू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात उन्हाळ्यात कशा प्रकारे फ्रिजचा वापर करावा.

– उन्हाळ्यात तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये योग्य तापमान राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थंड होण्याची सेटिंग मध्यम तापमानापेक्षा थोडी जास्त सेट करणे चांगले. यामुळे फ्रिजच्या यात संतुलित तापमान राखण्यास मदत होते आणि अन्न लवकर खराब होण्यापासून रोखले तसेच जर फ्रिजच्या आत तापमान खूप कमी असल्यास विजेचा वापर वाढू शकतो.

– उन्हाळ्याच्या दिवसात फ्रिज जास्त वेळा उघडल्यानेही त्याच्या आतील कुलिंग तापमानावर परिणाम होतो. सतत जर तुम्ही फ्रिज उघडत असाल तर थंड हवा बाहेर पडते, ज्यामुळे मशीनला पुन्हा फ्रिजच्या आत कुलिंग तयार करण्यासाठी अधिक काम करावे लागते. म्हणून आवश्यक असेल तेव्हाच रेफ्रिजरेटर उघडण्याचा प्रयत्न करा आणि लगेच फ्रिजचा दरवाजा बंद करा.

– गरम अन्नपदार्थ जर तुम्ही लगेच फ्रिजमध्ये ठेवल्यानेही आतील कुलिंग तापमान कमी होऊ शकतो. गरम पदार्थांच भांड जेव्हा फ्रिजच्या आत ठेवल्याने त्यातील अंतर्गत तापमान अचानक वाढते, ज्यामुळे कंप्रेसरवर अतिरिक्त ताण येतो. म्हणून नेहमी गरम अन्न पदार्थ साधं खोलीच्या तापमाना असेल तेव्हाच फ्रिजमध्ये ठेवणे चांगले.

– फ्रिजमध्ये जास्त सामान भरून ठेऊ नका. कारण फ्रिजच्या आतील थंड हवेला फिरण्यास पुरेशी जागा नसते तेव्हा कुलिंग योग्य प्रमाणात होत नाही. म्हणून वस्तू व पदार्थ व्यवस्थितपणे ठेवल्यास थंड हवा प्रत्येक भागात सहज पोहोचू शकेल.

– तुम्ही जेव्हा फ्रिजच्या ठेवता तेव्हा त्याच्या आजूबाजूला काही जागा ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. यामुळे हवेचा प्रवाह सहज होतो आणि फ्रिजचे मशिन चांगल्यारितीने काम करते. जर फ्रिज भिंतीजवळ खूप जवळ ठेवला तर त्याचा कूलिंग सिस्टमवर परिणाम होऊ शकतो.

-तुमचा रेफ्रिजरेटर वेळोवेळी स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे. रबर सील, ट्रे आणि व्हेंट्स स्वच्छ ठेवल्याने मशीनची थंडी वाढते. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास उन्हाळ्यात तुमचा रेफ्रिजरेटर अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us