चमकदार आणि लांब केस पाहिजेत? तर केसांना लावा अॅवकाडो, होतील अनेक फायदे !

| Updated on: May 03, 2021 | 11:21 AM

केसांची निगा राखण्यासाठी आपण विविध उपाय करतो. मात्र, हे करून देखील अनेकांचे केस कोरड्या आणि निर्जीव होतात.

चमकदार आणि लांब केस पाहिजेत? तर केसांना लावा अॅवकाडो, होतील अनेक फायदे !
Follow us on

मुंबई : केसांची निगा राखण्यासाठी आपण विविध उपाय करतो. मात्र, हे करून देखील अनेकांचे केस कोरड्या आणि निर्जीव होतात. केसांचा कोरडेपणा आणि निर्जीवपणा घालवण्यासाठी अॅवकाडो अत्यंत फायदेशीर आहे. अॅवकाडोमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन बी, सी आणि ई असतात. आरोग्याबरोबरच त्वचा आणि केसांसाठीही अॅवकाडो अत्यंत फायदेशीर आहे. यात अमीनो अॅसिडस् आणि जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे केसांचे पोषण आणि नमी कमी होण्यास मदत होते. (Avocado fruit is beneficial for hair)

केसांना मॉइश्चराइज करते
स्टाईलिंग आणि उष्णतेमुळे केस सर्वात तुटतात. अॅवकाडोमध्ये असलेले नैसर्गिक तेल ओलावा पुन्हा भरण्यास मदत करते. अॅवकाडो नियमितपणे केसांना लावल्यास केस मऊ होतात.

केसांची लांबी वाढवते
अॅवकाडोमुळे केस गळती थांबण्यास मदत होते. व्हिटॅमिन बी आणि ईमध्ये समृद्ध अॅवकाडो असल्यामुळे ते आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे अॅवकाडोमुळे केस चमकदार होतात.

डोक्यातील कोंडा जातो
अॅवकाडोमध्ये भरपूर प्रमाणात अमीनो अॅसिड असतात. ज्यामुळे केसांमधील कोंडा जाण्यास मदत होते. जर तुम्हाला कोंड्याची जास्त समस्या असेल तर आठवड्यातून दोन वेळा अॅवकाडो केसांना लावा.

अॅवकाडो आणि नारळ तेल
एका वाटीत अॅवकाडो बारीक करून घ्या आणि त्यामध्ये दोन चमके नारळ तेल घाला. आपण आपल्या केसांनुसार नारळ तेल घालू शकता. यानंतर, हलक्या हातांनी टाळूवर हे मिश्रण लावा आणि सुमारे 10 मिनिटे मालिश करा.

अॅवकाडो आणि एलोवेरा जेल मास्क
आपल्याला एक अॅवकाडो, 2 चमचे एलोवेरा जेल आणि नारळ तेल घ्यावे लागेल. या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाळूवर लावा आणि थोड्या वेळाने पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Snoring Issue | जाणून घ्या का उद्भवते घोरण्याची समस्या? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि शांत झोपेचा आनंद घ्या…

(Avocado fruit is beneficial for hair)