Weight Loss Tips : वजन घटवताना या चुका टाळाल तर भरपूर फायदा मिळवाल, अन्यथा…

वजन कमी करणारे बहुतेक लोक काही अशा चुका पुन्हा पुन्हा करतात, ज्यामुळे वजन कमी करण्याचा प्रवास मंदावतो. जलद वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत तुम्ही स्वतःचेचे नुकसान करून घेता.

Weight Loss Tips : वजन घटवताना या चुका टाळाल तर भरपूर फायदा मिळवाल, अन्यथा...
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 13, 2023 | 10:37 AM

नवी दिल्ली : वजन कमी करणे (Weight Loss) खूप अवघड आहे पण सोशल मीडियावर (social media) ते खूप सोपे दाखवले जाते. वजन कमी करण्याच्या प्रवासात केवळ संघर्षच करावा लागत नाही तर इतर अनेक गोष्टींनाही सामोरे जावे लागते. बरेच वेळा असा समज पसरवला जातो की काही दिवसात वजन झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होते, परंतु तसे अजिबात नाही. अशी कोणतीही जादूची छडी नाही जी तुमचे वजन क्षणार्धात कमी करू शकते. बहुतेक वजन कमी करणारे लोक अशा समजांमुळे गोंधळून जातात आणि ते काही चुका पुन्हा करतात ज्यामुळे वजन कमी करण्याचा प्रवास मंदावतो.

वजन किती कमी झाले हे वारंवार तपासणे यासारख्या अनेक चुका यात समाविष्ट आहेत. जलद वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत तुम्ही स्वतःचे कसे नुकसान करत आहात ते जाणून घेऊया.

कमी खाणं किंवा डाएटिंग

वर्कआउट्ससोबतच डाएटिंगचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. महागड्या डाएट योजनांमुळे वजन कमी होऊ शकते, परंतु त्याच्याशी संबंधित चूक खूप मोठी ठरू शकते. जास्त वेळ उपाशी राहिल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. किंवा डाएटच्या नावाखाली कोणताही पदार्थ खाणे, हे देखील हानी पोहोचवते. डाएटिंगचे पालन करा पण त्यासाठी तज्ञांचा योग्य सल्ला जरूर घ्या.

वारंवार वजन तपासणे

पटापट वजन कमी करण्यासाठी, लोक वारंवार वजनकाट्यावर वजन चेक करत राहतात. असे केल्याने तुमच्यावर एक प्रकारचा दबाव येतो. वजन कमी करण्यासाठी व्यायाम, दिनचर्या आणि आहार यावर लक्ष केंद्रित करणे चांगले.

कमी किंवा जास्त व्यायाम करणे

एका रात्रीत वजन कमी करणे कोणालाही शक्य नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून तुम्हाला प्रेरणा मिळू शकते, मात्र शारीरिक हालचाली, व्यायाम करून वजन कमी करता येऊ शकते. पण खूप कमी किंवा खूपच जास्त व्यायामामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

लो फॅट किंवा कॅलरी फूड

वजन कमी करताना डाएटिंग उत्तम आहे, पण या प्रक्रियेत पोषक तत्वांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. लोक कॅलरी किंवा चरबीचे सेवन कमी करतात ज्यामुळे शरीरात समस्या निर्माण होऊ लागतात.

पुरेशी झोप न घेणे

बहुतेक लोकांमध्ये असा समज पससरलेला आहे की वर्कआउट आणि डाएटिंगमुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागते पण तसे नाही. दररोज पुरेशी झोप न घेतल्यास मानसिक तणाव कायम राहतो. अशा स्थितीत वजन कमी करण्यात अडचणी येऊ शकतात.