Health | वर्कआऊटपूर्वी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा वाया जाईल तुमची मेहनत!

| Updated on: Feb 12, 2021 | 7:07 PM

वर्कआऊट होण्यापूर्वी चुकीचा आहार सेवन केल्याने आपल्या शरीरावर उलट परिणाम देखील होऊ शकतो आणि यामुळे आपले वजन कमी होण्याऐवजी, वाढू लागते.

Health | वर्कआऊटपूर्वी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा वाया जाईल तुमची मेहनत!
वर्कआऊट्
Follow us on

मुंबई : जेव्हा वजन कमी करण्याची वेळ येते, तेव्हा आपला आहार त्यात महत्वाची भूमिका बजावतो. योग्य आणि निरोगी खाणे केवळ आपले वजन नियंत्रणातच ठेवत नाही, तर वजन कमी करण्यात देखील मदत करते. योग्य खाण्याबरोबरच केलेला वर्कआऊट आपल्याला लठ्ठपणा आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम करतो. व्यायामानंतर भूक लागणे हे बरेच सामान्य आहे. जास्त व्यायाम केल्यानंतर किंवा त्यापूर्वी आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपल्याला काहीतरी खावे लागते. परंतु, या दरम्यान आपण वर्कआऊट करण्यापूर्वी काय खात आहात, याकडे लक्ष ठेवणे फार महत्वाचे आहे. कारण हे आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते (Avoid these food before weight loss workout).

यामुळेच वर्कआऊट करण्यापूर्वी आपण काय खाल्ले आणि काय नाही, याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. कारण वर्कआऊट होण्यापूर्वी चुकीचा आहार सेवन केल्याने आपल्या शरीरावर उलट परिणाम देखील होऊ शकतो आणि यामुळे आपले वजन कमी होण्याऐवजी, वाढू लागते. चला तर, जाणून घेऊया वर्कआऊट करण्यापूर्वी कोणते पदार्थ खाऊ नयेत याबद्दल…

गोड पदार्थ

आहारतज्ज्ञांच्या मते, एखाद्याने कसरत करण्यापूर्वी कधीही साखरयुक्त अन्न खाऊ नये. त्यामध्ये भरपूर प्रमाणात चरबी असते, ज्यामुळे आपल्या पोटात जडपणा जाणवतो आणि हे खाल्ल्यानंतर, जेव्हा आपण वर्कआऊट्सला जातात, तेव्हा ते थकल्यासारखे वाटतात आणि योग्यरितेने वर्कआऊट करणे टाळले जाते. तसेच हे पदार्थ खाल्ल्याने ऊर्जा पातळी कमी होते आणि झोप देखील येते. वर्कआऊट होण्यापूर्वी कधीही गोड पदार्थ खाऊ नका.

भरपूर आहार

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर कसरत करण्यापूर्वी कधीही जड अन्न खाऊ नका. तळलेले पदार्थ, उच्च चरबीयुक्त पदार्थ आणि अधिक अन्न खाण्यामुळे, आपल्याला खूप थकवा जाणवायला लागतो. ज्यामुळे वर्कआऊट करण्यात अडचण येते. एवढेच नव्हे, तर जास्त तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाणेही तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणून, वर्कआउट करण्यापूर्वी कधीही असे जड अन्न खाऊ नका (Avoid these food before weight loss workout).

तेलकट मसालेदार अन्न

जास्त मसालेदार अन्न पचन करण्यास खूप त्रास होतो आणि काहीवेळा यामुळे चिडचिडेपणा व पचन समस्या उद्भवतात. यामुळे कधीकधी आपल्या पोटात अनेक समस्या देखील उद्भवतात. ज्यामुळे, कसरत करणे कठीण होते. म्हणून कसरत करण्यापूर्वी मसालेदार किंवा तेलकट अन्न खाऊ नका. या गोष्टी लक्षात ठेवल्यास आपल्याला वेदना आणि अस्वस्थतेपासून मुक्ती मिळेल.

अनावश्यक पेय

कोला आणि इतर सॉफ्ट ड्रिंक्ससारख्या अनावश्यक पेयांमध्ये भरपूर साखर असते. म्हणूनच, अशा प्रकारचे पेय वर्कआऊट करण्यापूर्वीच नव्हे तर कोणत्याही वेळी पिऊ नयेत. कारण, त्यात पोषक घटक नसतात आणि शरीरात साखरेचे प्रमाण वाढवतात. म्हणून वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये असे पेय कधीही घेऊ नये. हे वजन कमी करण्याऐवजी, आपले वजन वाढवण्यास सुरूवात करतात. ज्यामुळे तुम्हाला अडचण येऊ शकते.

फायबर रिच फूड

बहुतेक आहारतज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी फायबर समृद्ध अन्न घेण्याची शिफारस करतात. तथापि, वजन कमी करण्यात व्यायामाच्या आधी फायबर-युक्त पदार्थ सेवन करण्याने विपरीत परिणाम दिसून येतो. वर्कआऊट्सच्या आधी ओट्स, व्हिट ब्रेड सँडविच आणि पास्ता यासारख्या गोष्टी खाल्ल्यास वर्कआऊट्समध्ये त्रास होऊ शकतो. वास्तविक, या गोष्टी पचन करायला वेळ लागतो, म्हणूनच ते शरीरात बराच काळ तसेच राहतात आणि आपल्याला भूक लागत नाही. म्हणून, वर्कआऊट करण्यापूर्वी फायबरयुक्त अन्न खाणे ही एक वाईट कल्पना असू शकते.

(Avoid these food before weight loss workout)

हेही वाचा :