Hair Tips | पातळ केसांना व्हॉल्यूम हवाय? मग, ‘या’ चुका करणे टाळा!

| Updated on: Feb 15, 2021 | 4:34 PM

पातळ केस सेट करणे तसे थोडे कठीणच आहे. अशा परिस्थितीत आपले केस जास्त पातळ असल्यास आपण त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतलीच पाहिजे.

Hair Tips | पातळ केसांना व्हॉल्यूम हवाय? मग, ‘या’ चुका करणे टाळा!
नारळाचे दूध आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते. अर्धा कप नारळाचे दूध घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या केसांना लावा. वीस ते तीस मिनिटांनंतर आपले केस थंड पाण्याने धुवा. (टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
Follow us on

मुंबई : प्रत्येक स्त्रीच्या केसांची गुणवत्ता वेग वेगळी असते. काहींचे केस सरळ असतात, तर काही व्हेव्ही किंवा काहींचे केस कुरळे देखील असतात. त्याचप्रमाणे काही मुलींचे केस खूप पातळ असतात. पातळ केसांची काळजी घेणे थोडे अवघड आहे. आपण एकतर आपल्या केसांमध्ये व्हॉल्युमायझिंग स्प्रे किंवा ब्लो ड्रायर वापरू शकता (Avoid these mistakes while taking care of thin hair).

पातळ केस सेट करणे तसे थोडे कठीणच आहे. अशा परिस्थितीत आपले केस जास्त पातळ असल्यास आपण त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतलीच पाहिजे. केसांची काळजी घेताना, बहुतेक लोक सामान्य चुका करतात. आज आम्ही आपल्याला या चुकांबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून आपण आपल्या केसांची खास काळजी घेऊ शकता.

चुकीचा शॅम्पू आणि कंडिशनर

केसांच्या स्टाईलसाठी योग्य उत्पादन वापरणे फार महत्वाचे आहे. बर्‍याच वेळा शॅम्पू आणि कंडिशनर आपल्या पातळ केसांसाठी चांगले नसतात. याशिवाय कंडिशनर लावताना हे लक्षात ठेवा की, केसांच्या मुळामध्ये कंडिशनर लावू नये. त्याशिवाय केस गळती टाळण्यासाठी शॅम्पूसह, त्याच्या अर्धा कंडिशनर वापरा.

स्काल्पकडे दुर्लक्ष करू नका

स्काल्प स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून 3 वेळा शॅम्पू वापरून केस स्वच्छ करा. स्काल्पवर योग्य पद्धतीने शॅम्पू करा. जेणेकरून धूळ, माती, प्रदूषण आणि केसांतील तेल व्यवस्थित स्वच्छ होईल.

योग्य मार्गाने केस कोरडे करा

पातळ केसांमध्ये ब्लो ड्रायरचा वापर केल्याने केसांमध्ये बाऊन्स निर्माण होतो. कारण, आपण पार्लरमध्ये ब्लो ड्राय केल्यास, ते व्यवस्थित सेट केले जातात. केसांवर ब्लो ड्रायर वापरण्यापूर्वी व्हॉल्यूमिंग स्प्रे चा नेहमी वापर करावा. या नंतर केस व्यवस्थित कोरडे करावे.

आवश्यकतेपेक्षा जास्त उत्पादनांचा वापर

पातळ केसांचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त उत्पादनांचा वापर कधीही केला जाऊ नये. नेहमी लाईटवेत उत्पादनांचा वापर केला पाहिजे. तसेच, हेवी मॉइश्चरायझिंग उत्पादने वापरणे टाळा (Avoid these mistakes while taking care of thin hair).

घरगुती कंडिशनर

आपल्या केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी आणि ते चमकदार होण्यासाठी, केस धुतल्यानंतर कंडीशनिंग करणे महत्वाचे आहे. तसे, बाजारात आधीपासूनच बऱ्याच प्रकारचे कंडिशनर्स आहेत, जे आपल्या केसांना ठराविक काळासाठी चमकदार बनवू शकतात. परंतु, या कंडिशनर्समध्ये रसायने खूप जास्त प्रमाणात असता. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ती खूप घातक सिद्ध होतात. ही रसायने आपल्या केसांना रुक्ष आणि निर्जीव बनवतात. अशावेळी आपण घरगुती हेअर कंडिशनर वापरू शकता.

कोरफड

कोरफड आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे केवळ आपल्या त्वचेची काळजी घेत नाही, तर आपल्या केसांसाठीही फायदेशीर ठरतात. यामुळे आपले केस चमकदार होतात. कोरफडयुक्त हेअर कंडिशनर बनवण्यासाठी, प्रथम कोरफडच्या पानांतून गर काढा. आता एक चमचे लिंबाचा रस, 4 चमचे कोरफड जेलमध्ये घाला. आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे आपल्या केसांवर तसेच राहू द्या. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने आपले केस स्वच्छ करा.

(Avoid these mistakes while taking care of thin hair)

हेही वाचा :