Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

जर, तुम्हाला कधी किडनी स्टोनची समस्या उद्भवली असेल किंवा कुटूंबातील एखाद्या सदस्याला मुतखड्याची समस्या उद्भवली असेल, तर मग तुम्हाला हे चांगलेच कळले असेल की, या वेदना किती तीव्र असतात.

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!
किडनी सुपर हेल्दी ठेवायचीय? मग या पदार्थांचे सेवन करा
Harshada Bhirvandekar

|

Mar 01, 2021 | 2:40 PM

मुंबई : जर, तुम्हाला कधी किडनी स्टोनची समस्या उद्भवली असेल किंवा कुटूंबातील एखाद्या सदस्याला मुतखड्याची समस्या उद्भवली असेल, तर मग तुम्हाला हे चांगलेच कळले असेल की, या वेदना किती तीव्र असतात. कधीकधी रुग्णाला वेदना सहन करणे अशक्य होते. मुतखडा (किडनी स्टोन) हा आजार आहे, जो पुन्हा पुन्हा होऊ शकतो. जवळजवळ 50% टक्के रुग्ण असे आहेत की, एकदा मुतखड्याची समस्या कमी झाल्यास पुन्हा ही समस्या 7-8 वर्षात डोकं वर काढते. म्हणून खबरदारी घेणे फार महत्वाचे आहे, विशेषत: अन्नाच्या संदर्भात काही नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत (Avoid this food if you have kidney stone problem).

किडनी स्टोनच्या रूग्णांनी ‘या’ गोष्टी टाळाव्यात.

अमेरिकेच्या नॅशनल किडनी फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मूत्रामध्ये उपस्थित लहान क्रिस्टल्स सॉलिड नोड्युलसचे रूप घेतात, तेव्हा किडनी स्टोनचा त्रास होतो. ऑक्सलेट किंवा फॉस्फरस सारख्या रसायनांसह एकत्रित झाल्यास मूत्रामध्ये उपस्थित कॅल्शियम, मूत्रपिंडात खड्यांची समस्या उद्भवू शकते. तसेच, किडनीमध्ये यूरिक आम्ल जमा झाल्यामुळे देखील बर्‍याच वेळा खड्यांचा त्रास उद्भवतो. जर, तुम्हाला किडनी स्टोनची समस्या होऊ नये, असे वाटत असेल तर ‘या’ पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे आणि आधी तुम्हाला किडनी स्टोनची समस्या उद्भवली असेल, तर तुम्ही या गोष्टी टाळाव्यात.

पालक

पालक हा लोहाचा चांगला स्रोत असून, त्यात बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील समृद्ध प्रमाणात असतात. परंतु, मूत्रपिंडात खड्यांची समस्या असल्यास पालक खाणे टाळले पाहिजेत. यामागचे कारण असे आहे की, पालकात ऑक्सलेट असतो जो रक्तात असलेल्या कॅल्शियमशी स्वतःला सांधतो आणि मूत्रपिंड ते फिल्टर करू शकत नाहीत आणि मूत्रमार्गाने ते शरीराबाहेर पडू शकत नाहीत, ज्यामुळे मूत्रपिंडात हे बारीक बारीक दगड बनतात.

ऑक्सलेटयुक्त अन्न

पालक व्यतिरिक्त बीटरुट, भेंडी, रास्पबेरी, रताळे, चहा, नट, चॉकलेटमध्येही ऑक्सलेट घटक जास्त असतात. जर, एखाद्या रुग्णाला किडनी स्टोनची समस्या उद्भवली असेल, तर डॉक्टर पेशंटला ऑक्सलेट युक्त वस्तू अजिबात खाऊ नका किंवा मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात (Avoid this food if you have kidney stone problem).

चिकन, मासे, अंडी

लाल मांस, कोंबडी, पोल्ट्री प्रोडक्ट, मासे आणि अंडी हे असे काही पदार्थ आहेत, ज्यात Animal Protein जास्त प्रमाणात असतात. आणि या गोष्टींच्या अति सेवनाने शरीरात यूरिक आम्लाचे उत्पादन जास्त होते. प्रथिने आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असल्याने, टोफू, किनुवा, सब्जा बियाणे आणि ग्रीक दही इत्यादी वनस्पती आधारभूत प्रथिने खावीत.

कमीत कमी मीठ

मीठात सोडियम असते आणि सोडियम जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूत्रात कॅल्शियम तयार होण्यास सुरुवात होते. म्हणून अन्नात जास्त मीठ घालणे टाळा. याशिवाय मिठाचे प्रमाण जास्त असलेले चिप्स, फ्रीज केलेल्या अन्नाचे सेवन करणे टाळा.

कोला किंवा सॉफ्ट ड्रिंक

कोलामध्ये फॉस्फेट नावाचे एक केमिकल आहे, ज्यामुळे मूत्रपिंडात दगड तयार होण्याची शक्यता असते. म्हणून, प्रक्रिया केलेले अन्न आणि पेय जास्त प्रमाणात पिऊ नका. तय्त केवळ मीठच नाही, तर जास्त साखर – सुक्रोज आणि फ्रुक्टोजमुळे किडनी स्टोनचा धोकाही वाढतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Avoid this food if you have kidney stone problem)

हेही वाचा :

Make Up Tips | मेकअप लावल्याने चेहऱ्यावर डाग पडतायत? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स…

Oily Skin | तेलकट त्वचेच्या समस्येने हैराण? मग ‘या’ गोष्टी खाणे टाळा!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें