Benefits Of Tulsi Leaves : तुळस अनेक आजारांवर गुणकारी, वाचा याबद्दल अधिक !

| Updated on: May 11, 2021 | 9:37 AM

हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. तुळशीला आयुर्वेदात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Benefits Of Tulsi Leaves : तुळस अनेक आजारांवर गुणकारी, वाचा याबद्दल अधिक !
तुळश
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. तुळशीला आयुर्वेदात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तुळशीमध्ये अँटीबायोटिक, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुळश कार्य करते. चला त्याचे फायदे जाणून घेऊया. (Basil leaves are extremely beneficial for boosting the immune system)

ताप व सर्दीसाठी – तुळशीची पाने ताप आणि सर्दीसाठी फायदेशीर आहेत. आपण चहामध्ये टाकून तुळशीच्या पानांचे सेवन करू शकतो. यासाठी तुळशीची पाने पाण्यात उकळावी लागतील आणि त्याचे सेवन करावे लागेल.

डोकेदुखीसाठी – तुळशीच्या पानांचा चहा डोकेदुखी दूर करण्यासाठी चांगला आहे. आपण कपाळावर तुळशी आणि चंदनची पेस्ट देखील लावू शकता. यामुळे डोकेदुखीमध्ये आराम मिळतो.

पोटदुखीची समस्या – पोटात दुखणे, बद्धकोष्ठता आणि अपचन यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. त्यासाठी तुळशीचा एक चमचा रस आणि आल्याचा एक चमचा रस मिसळावा. यामुळे पोटदुखीमध्ये आराम मिळेल. मासिक पाळीच्या वेदनासाठी आपण तुळशी चहा देखील घेऊ शकता. यामुळे वेदनापासून आराम मिळेल.

त्वचेसाठी – तुळशीमध्ये डिटोक्सिफाईंग आणि क्लींजिंग गुणधर्म आहेत. त्यात लिनोलिक अॅसिड असते. हे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. तुम्ही तुळशीची पाने आणि बेसन पीठ मिक्स करून त्वचेवर लावू शकता. यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते.

रोगप्रतिकारक शक्ती – तुळशीत रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अँटीऑक्सिडेंट असतात. ते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. चहामध्ये किंवा कच्चे देखील आपण तुळशीचे पाने खाऊ शकतो.

-तुळस आपल्या शरीरास डिटोक्स करते आणि चयापचय दर वाढवते. तुळशीची पाने वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरतात. मुख दुर्गंधीचा त्रासही तुळशीच्या पानांनी नाहीसा होतो. जर तुम्ही दररोज सकाळी तुळशीची पाने रिकाम्या पोटी खाल्ली तर, ती तोंडातील बॅक्टेरिया काढून टाकतात आणि तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास दूर करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

Low Blood Pressure | कमी रक्तदाबाची समस्या? मग, आहारात सामील करा ‘हे’ घटक!

(Basil leaves are extremely beneficial for boosting the immune system)