Beauty Tips : रक्षाबंधनासाठी आतापासून ‘हे’ ब्युटी रूटीन करा फॉलो; तुम्हाला मिऴतील हे फायदे!

| Updated on: Aug 04, 2022 | 10:48 PM

Rakshabandhan, Beauty Routine, Benefits, Skin, Protection रक्षाबंधन, ब्युटी रूटीन, फायदे, त्वचा, संरक्षण

Beauty Tips : रक्षाबंधनासाठी आतापासून ‘हे’ ब्युटी रूटीन करा फॉलो; तुम्हाला मिऴतील हे फायदे!
फाईल फोटो
Image Credit source: TV9
Follow us on

रक्षाबंधन सणासाठी माहेरी जाण्यापूर्वी स्वतः छान तयार होण्यास अनेक महिलांना आवडते. परंतु, कामाच्या धावपळीत स्वतः कडे दुर्लक्ष होते. पंरतु, आतापासूनच ब्युटी रूटीन (Beauty routine) फॉलो केल्यास, तुम्हाला राखीसाठी आउटफिटच नाही तर ग्लोइंग स्किनसह सुंदर लुक देखील मिळवता येईल. रक्षाबंधनाला केवळ महिलाच नाही तर पुरुषही सर्वोत्कृष्ट दिसण्यासाठी (To look your best) सर्वतोपरी प्रयत्न करतात. पोशाखांपासून ते शूजपर्यंत सर्व काही आपला लूक छान बनवण्यासाठी कार्य करते. दरम्यान, त्वचेची विशेष काळजी घेणे देखील आवश्यक मानले जाते, कारण जर त्वचा निस्तेज दिसत असेल तर, संपूर्ण लुक देखील खराब होऊ शकतो. त्वचेला एका दिवसात ग्लोइंग करता येत नाही. बहुतेक वेळा, लोक सणाच्या किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी एक दिवस आधी ब्लीच, स्क्रबिंग किंवा फेशियल (Scrubbing or facial) करून चमकदार त्वचा मिळविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, तज्ज्ञांच्या मते, चमकदार त्वचा मिळविण्यासाठी ब्युटी रूटीन पाळले पाहीजे.

दिवसा त्वचेची काळजी

रोज सकाळी उठल्याबरोबर चेहरा धुवा. यासाठी तुम्हाला बाजारात अनेक उत्पादने मिळतील. पण तुम्ही नैसर्गिक पद्धतीने स्किन क्लीनिंगही करू शकता. यासाठी कोरफडीचे जेल घेऊन चेहऱ्यावर आणि हातांवर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. आता कापसात गुलाबपाणी टाका आणि सहज काढा. तुम्ही हे रोज देखील करू शकता.

एक्सफोलिएशन

राखीपूर्वी किमान दोनदा त्वचा स्क्रब करावी. अक्रोड आणि इतर गोष्टींपासून बनवलेले स्क्रब बाजारात मिळतीलच, पण तुम्ही त्वचेला नैसर्गिकरित्या एक्सफोलिएटही करू शकता. एका भांड्यात दोन ते तीन चमचे मध घ्या आणि त्यात थोडी कॉफी मिसळा. हे नैसर्गिक स्क्रब बनेल. आता त्वचेला चोळा आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा.

चेहऱयाला मसाज करा

राखीच्या ब्युटी रुटीनमध्ये तुम्हाला त्वचेची मसाजही करावी लागेल. दररोज त्वचेला घासणे चांगले नाही, परंतु राखीला अद्याप एक आठवडा बाकी आहे आणि आपण कमीतकमी तीन वेळा त्वचेची मसाज केली पाहिजे. तुम्हाला बाजारात अनेक हर्बल उत्पादने मिळतील, ज्यातून त्वचेची खोल साफसफाई करता येते.

रात्रीचे रूटीन

त्वचेची काळजी घेताना केवळ दिवसाच नाही तर रात्री झोपण्यापूर्वीही त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. रात्रीच्या स्किन केअर रूटीनमध्ये, प्रथम त्वचा स्वच्छ करा आणि नंतर त्यावर सीरम लावा. राखीनंतरही तुम्हाला सीरमचे रूटीन पाळावी लागेल. यानंतर त्वचेला मॉइश्चरायझरने लॉक करायला विसरू नका. जर तुम्हाला नैसर्गिकरीत्या मॉइश्चरायझेशन करायचे असेल तर तुम्ही व्हर्जिन कोकोनट ऑइलची मदत घ्यावी.

(या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे अनुसरण करा.)