Skin Care : कढीपत्ता आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा! 

| Updated on: Jul 03, 2021 | 7:05 AM

बदलेली जीवनशैली, वाढते वय, खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी यामुळे आरोग्याची तसेच सौंदर्याचीही समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. त्वचेची काळजी नीट घेत नसल्यामुळे त्वचेसंबंधीत अनेक समस्यां उद्भवतात.

Skin Care : कढीपत्ता आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा! 
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : बदलेली जीवनशैली, वाढते वय, खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी यामुळे आरोग्याच्या तसेच त्वचेच्याही समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. त्वचेची काळजी नीट घेत नसल्यामुळे त्वचेसंबंधीत अनेक समस्यां उद्भवतात. आपली निरोगी आणि स्वच्छ त्वचा ही खरी सुंदरता आहे. परंतु वाढते वय आणि काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात.  (Curry leaves and curd face pack are beneficial for the skin)

कढीपत्ता आणि दही हे दोन्ही आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासह बरेच पौष्टिक घटक आहेत. कढीपत्ता केस आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. आपण जर दही आणि कढीपत्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावला तर चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी कढीपत्ताची पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये दही मिक्स करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण वीस मिनिटे ठेवा आणि त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. ही पेस्ट आपण आठवड्यातून किमान एकदा लावली पाहिजे. चेहर्‍यावरील मुरुमांचे डाग दूर करण्यासाठी अर्धा चमचे लिंबाचा रस एक चमचा दहीमध्ये मिसळा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 15 मिनिटे ठेवा आणि आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. अकाली सुरकुत्या कमी करण्यासाठी दोन चमचे दहीमध्ये एक चमचे ओट्स घाला आणि 10 मिनिटे भिजू द्या.

आता दोन्ही एकत्र करून पेस्ट बनवा. 15 मिनिटे चेहरा मालिश करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर चार चमचे दह्यामध्ये एक चमचा मध मिसळा. आता हे मिश्रण फेसपॅक म्हणून लावा. सुमारे 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. टॅनिंग पूर्ण करण्यासाठी दोन चमचे दह्यामध्ये दोन चिमटी हळद घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे ठेवा. मग स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Milk Benefits | दररोज एक ग्लास गरम दूध सेवन करा, ‘या’ आजारांना दूर पळावा!

(Curry leaves and curd face pack are beneficial for the skin)