Skin Care : दही, हळद आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Jul 20, 2021 | 8:46 AM

त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते.

Skin Care : दही, हळद आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली हवी असेल तर घरगुती उपाय करा. आपण घरामध्ये असलेल्या साहित्याच्या आधारे फेसपॅक तयार करू शकतो. (Face pack of curd, turmeric and rice flour is beneficial for the skin)

दही, हळद आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला 3 चमचा दही, 1 चमचा हळद आणि 2 चमचे तांदळाचे पीठ लागणार आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वात अगोदर वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यानंतर वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

मुलतानी माती, मध आणि लिंबाचा फेसपॅक तयार करण्यासाठी मुलतानी माती एक चमचा, लिंबाचा रस एक चमचा आणि मध एक चमचा मिक्स करून घ्या आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला आणि मानेला लावा. साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. ही पेस्ट आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकतो.

फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा संत्र्याच्या पावडर घ्या त्यामध्ये दही व्यवस्थितपणे मिक्स करा. ही पेस्ट साधारण 20 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा धुवा हि प्रक्रिया आठवड्यातून दोन वेळा केली तर तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. 1 चमचे संत्र्याच्या सालीचा पावडर घ्या त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचे मध घालाव. ही हे पेस्ट चांगली मिक्स करा यानंतर 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर ही पेस्ट लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त कोरफडचे तेल घरच्या घरी कसे बनवाल?; वाचा तर खरं!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Face pack of curd, turmeric and rice flour is beneficial for the skin)