त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त कोरफडचे तेल घरच्या घरी कसे बनवाल?; वाचा तर खरं!

कोरफड ही वनस्पती आपल्या त्वचेसाठी अत्यंत चांगली आहे. कोरफडचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो.

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त कोरफडचे तेल घरच्या घरी कसे बनवाल?; वाचा तर खरं!
कोरफडची तेल

मुंबई : कोरफड ही वनस्पती आपल्या त्वचेसाठी अत्यंत चांगली आहे. कोरफडचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो (Benefits of aloevera). अगदी कुठल्याही ऋतूत कोरफडीचा वापर करता येतो. कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. कोरफडीचा गर त्वचेला थंडावा देतो. (Special tips for making aloe vera oil at home)

कोरफडीचे तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडीचे तेल बनविणे खूप सोपे आहे, कोणीही ते सहज घरी तयार करू शकते. हे तेल तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च देखील येत नाही. ताजी कोरफड द्या आणि अर्धा कप डोक्याला लावण्याचे नारळाचे तेल घ्या. कोरफड स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कोरफडीचा बाजूचे काट्याचे भाग चाकूने काढून टाका काढलेली कोरफड आणि तेलाची चांगली पेस्ट करून घ्या त्यानंतर त्यानंतर हे तेल एका बाॅटलमध्ये टाका आणि रोज हे तेल केसांना लावा.

कोरफडीत मुबलक प्रमाणात ‘ई’ जीवनसत्व आढळते. त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती औषध ठरते. फुटलेल्या ओठांवर कोरफड जेल लावल्यास ओठ मुलायम होतात. कोरफड जेलमध्ये थोडेसे ऑलिव्ह तेल मिसळून लिप बामसारखे देखील वापरू शकता. सकाळी उठल्यावर डोळे सुजलेले आणि थकल्यासारखे जाणवत असल्यास कोरफडीचे पान मध्यभागी कापून डोळ्यावर ठेवल्यास आराम वाटेल. डोळ्यांच्या भोवती कोरफड जेल लावल्यास काळीवर्तुळे नाहीशी होतात.

कोरफडीच्या औषधी गुणांमुळे खरचटल्यास, कापल्यास, भाजल्यास किंवा एखादा किडा चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडचा वापर केला जातो. जगभरात कोरफडीच्या तब्बल 400हून अधिक प्रजाती आढळतात. परंतु, त्यापैकी केवळ 5 प्रजाती वापरल्या जातात. कोरफडात असलेल्या गुणांमुळे केस दाट आणि सुंदर होण्यास मदत होते. ही वनस्पती केसांच्या मुळातील पीएच घटकाचे संतुलन कायम राखण्यास मदत करते. कोरफडाने केस गळणे थांबते, केसांची वाढ चांगली होते, केसांतील कोंडा जातो, स्कॅल्पच्या समस्या दूर होतात आणि केसांचे चांगले पोषणही होते.

संबंधित बातम्या : 

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

Low Blood Pressure | कमी रक्तदाबाची समस्या? मग, आहारात सामील करा ‘हे’ घटक!

(Special tips for making aloe vera oil at home)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI