Karwa Chauth 2021: करवा चौथला चमकदार त्वचा मिळविण्यासाठी ‘या’ घरगुती टिप्स फाॅलो करा!

| Updated on: Oct 24, 2021 | 8:31 AM

करवा चौथ हा हिंदू विवाहित महिलांसाठी सर्वात खास आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी महिला त्यांच्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी उपवास करतात. दिवसाची सुरवात पहाटे करून प्रार्थना आणि हलके जेवण, ज्याला सर्गी म्हणतात. हा सर्वात कठीण उपवासांपैकी एक आहे.

Karwa Chauth 2021: करवा चौथला चमकदार त्वचा मिळविण्यासाठी या घरगुती टिप्स फाॅलो करा!
चमकदार त्वचेसाठी बॉडी लोशन आवश्यक, तुमच्या त्वचेनुसार निवडा योग्य लोश
Follow us on

मुंबई : करवा चौथ हा हिंदू विवाहित महिलांसाठी सर्वात खास आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी महिला त्यांच्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी उपवास करतात. दिवसाची सुरवात पहाटे करून प्रार्थना आणि हलके जेवण, ज्याला सर्गी म्हणतात. हा सर्वात कठीण उपवासांपैकी एक आहे. करवा चौथच्या पूर्वसंध्येला महिला साडी, सूट किंवा लेहेंगासारखे नवीन पारंपारिक कपडे घालतात. करवा चौथच्या दिवशी तुमचा लूक खास दिसण्यासाठी आज आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत.

1. क्लीनजिंग

चमकदार त्वचा मिळवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे क्लीनजिंग करणे. ज्यामुळे घाण काढून टाकण्यास मदत होईल. तुमची त्वचा क्लीनजिंग करण्यासाठी दूध, खोबरेल तेल, मध किंवा दही यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केला जाऊ शकतो.

एका भांड्यात दूध आणि मध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. कमीतकमी 2-3 मिनिटे सोडा आणि ओल्या कापडाने काढून टाका. हे केवळ चेहरा स्वच्छ करत नाही तर त्वचेला मॉइश्चराइझ देखील करते.

2. फेशियल स्टीमिंग

ही प्रक्रिया तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करतेच पण ब्लॅकहेड्स आणि काजळी देखील काढून टाकते. परिणामकारक परिणामांसाठी तुम्ही साधी वाफ घेऊ शकता किंवा पाण्यात नेरोली आणि जीरॅनियम तेलाचा एक थेंब टाकू शकता.

3. कोरफड

हे चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी सर्वोत्तम घटकांपैकी एक आहे. यासोबतच हे वृद्धत्व आणि मुरुम येण्यापासून बचाव करते. कोरफडमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेला हायड्रेटेड ठेवतात आणि खराब झालेली त्वचा दुरुस्त करतात.

4. एक्सफोलिएट

ही प्रक्रिया त्वचेच्या सर्व मृत पेशी काढून टाकते आणि चेहऱ्यावर रक्त प्रवाह वाढवते. एका भांड्यात खोबरेल तेल आणि साखर मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.

2 ते 5 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. आता उघडे छिद्र बंद करण्यासाठी मुलतानी माती लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these homemade tips to get Karwa Chauth beautiful skin)