Beauty Tips : मान, कोपर आणि गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!

चेहरा चमकदार करण्यासाठी सर्व उपाय केले जातात. पण प्रत्यक्षात शरीराचा प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. जर काळी मान आणि चेहरा गोरा दिसला किंवा स्लीव्हलेस ड्रेस आणि शॉर्ट्स घातल्यावर कोपर आणि गुडघे काळे दिसले तर कसे वाटेल? यामुळे तुमचे सौंदर्यही फिके पडेल.

Beauty Tips : मान, कोपर आणि गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी या टिप्स फाॅलो करा!
त्वचा
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 8:30 AM

मुंबई : चेहरा चमकदार करण्यासाठी सर्व उपाय केले जातात. पण प्रत्यक्षात शरीराचा प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. जर काळी मान आणि चेहरा गोरा दिसला किंवा स्लीव्हलेस ड्रेस आणि शॉर्ट्स घातल्यावर कोपर आणि गुडघे काळे दिसले तर कसे वाटेल? यामुळे तुमचे सौंदर्यही फिके पडेल. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाची वेळोवेळी काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला असे घरगुती उपाय सांगणार आहोत. जे तुमचे मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

काळेपणा दूर करण्यासाठी हे खास उपाय

1. अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा गुलाबजल मिसळा. हे मिश्रण मान, कोपर आणि गुडघ्यावर लावा आणि रात्रभर राहू द्या. असे काही दिवस सतत केल्याने फायदा होईल.

2. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. आंघोळ करण्यापूर्वी लावा आणि हलक्या हातांनी घासून घ्या. साधारण अर्धा तास तसेच राहू द्या. यानंतर हा भाग स्वच्छ करून आंघोळ करा. असे काही दिवस सतत करा. यामुळे काळेपणा दूर होण्यास मदत होते.

3. एका भांड्यात कच्चा बटाटा किसून घ्या, नंतर त्यात दही घालून मानेवर, कोपरांवर आणि गुडघ्यांवर लावा आणि 10 ते 15 मिनिटे कोरडे होऊ द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. काळेपणा दूर करण्यासाठी कच्चा बटाटा अत्यंत गुणकारी मानला जातो.

4. ज्या ठिकाणी काळेपणा आहे. त्या ठिकाणी काकडीचा रस लावा किंवा एलोवेरा जेल लावा. या दोन्ही गोष्टी काळेपणा नियंत्रित करतात. त्याचा सतत वापर करा. मग त्याचा परिणाम दिसून येईल.

5. टोमॅटो मिक्सरमध्ये चांगले बारीक करून मानेवर आणि कोपरावर लावा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात थोडे बेसनही मिक्स करू शकता. ते लावल्यानंतर हलक्या हातांनी मसाज करा आणि 15 ते 20 मिनिटे राहू द्या. यानंतर मान, कोपर आणि गुडघे स्वच्छ पाण्याने धुवा.

6. दही काळेपणा दूर करते आणि त्वचेतील आर्द्रता राखते. व्हिनेगरचे काही थेंब दह्यामध्ये मिसळा आणि प्रभावित भागावर लावा. कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे काळेपणा बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these special tips to get rid of elbow and knee blackness)