Hair Care Tips : केस कलर करतायेत? तर ‘या’ खास टिप्स फाॅलो करा

केस आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. हेच कारण आहे की लोक स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी केसांवर वेगवेगळे उपाय करतात. आजकाल केसांमध्ये रंग आणि हायलाइट करण्याची फॅशन आहे. केसांना रंग देण्यासाठी खूप पैसे लागतात.

Hair Care Tips : केस कलर करतायेत? तर 'या' खास टिप्स फाॅलो करा
मेंहदी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Oct 06, 2021 | 11:32 AM

मुंबई : केस आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. हेच कारण आहे की लोक स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी केसांवर वेगवेगळे उपाय करतात. आजकाल केसांमध्ये रंग आणि हायलाइट करण्याची फॅशन आहे. केसांना रंग देण्यासाठी खूप पैसे लागतात. जर केसांचा रंग पटकन फिकट झाला, तर तुमच्या लुकवरही परिणाम होतो आणि तुमचे पैसेही वाया जातात.

72 तासांनंतर शॅम्पू वापरा

केसांना कलर केल्यानंतर दोन ते तीन दिवस केस धुणे टाळा. शॅम्पू केल्याने रंग हलका होतो. म्हणून, केस कलर केल्यानंतर कमीतकमी 72 तास केसांना शॅम्पू करू नका. या व्यतिरिक्त, हे लक्षात ठेवा की आठवड्यातून दोनदा केसांना शॅम्पू करू नका.

प्रोटीन मास्क लावा

कलरमध्ये रसायने असतात, त्यामुळे कलर पूर्ण झाल्यानंतर केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केसांची चमक फिकट होते. केसांची काळजी घेण्यासाठी प्रोटीन मास्क खूप प्रभावी आहे. यासाठी, शॅम्पू करण्यापूर्वी आठवड्यातून एकदा एक हेअर मास्क लावा. यामुळे तुमचे केस खराब होणार नाहीत.

गरम पाणी वापरू नका

सामान्य पाण्याने केस धुवा. गरम पाण्याच्या वापराने केसांचा ओलावा निघून जातो, त्याचबरोबर कलरही लवकर निघतो आणि केस उग्र होऊ लागतात. त्यामुळे आपले केस गरम पाण्याने धुण्याची चूक करू नका.

सल्फेट मुक्त शॅम्पू वापरा

बहुतेक शैम्पू सल्फेट युक्त असतात, म्हणून कलर दिल्यानंतर, सल्फेट मुक्त शॅम्पू वापरा. यामुळे तुमच्या केसांचा कलर लवकर फिकट होणार नाही.

हीटिंग टूल्सचा जास्त वापर टाळा

हीटिंग टूल्स तुमच्या केसांना नक्कीच स्टायलिश लुक देतात, पण त्यांचा वापर केल्याने तुमचे केस खूप खराब होतात. ते तुमच्या केसांमधील ओलावा काढून टाकतात आणि त्यांना कोरडे करतात. त्यामुळे त्यांचा वापर टाळा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these special tips when coloring hair)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें