Skin | ताजी त्वचा मिळवण्यासाठी स्किन केअर रूटीनमध्ये खरबूजचा समावेश करा!

| Updated on: May 24, 2022 | 12:06 PM

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, हळद आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हळद मदत करते. दूध त्वचेला मॉइस्चराइज आणि एक्सफोलिएट करते. त्वचेला टवटवीत ठेवण्यास मदत होते. यासाठी एक चमचा खरबूजाच्या लगदा घ्या आणि त्यामध्ये एक चमचा दूध घाला आणि चांगले मिक्स करा.

Skin | ताजी त्वचा मिळवण्यासाठी स्किन केअर रूटीनमध्ये खरबूजचा समावेश करा!
Image Credit source: stylecraze.com
Follow us on

मुंबई : फळे आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही (Skin) फायदेशीर असतात. फळांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. उन्हाळ्यात खरबुजचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Beneficial) आहे. खरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते, तुम्ही उन्हाळ्यात खरबूजपासून बनवलेले होममेड फेस मास्क देखील वापरू शकता. खरबुजचा (Muskmelon) फेस मास्क त्वचेच्या सर्व समस्या दूर करते. इतकेच नाही तर ते त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते. त्वचा मऊ आणि मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी खरबुजचा फेस मास्क वापरा. चला जाणून घेऊया तुम्ही घरच्या-घरी त्वचेसाठी खरबूजचा फेस मास्क कसा तयार करू शकता.

खरबूज आणि दुध

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, हळद आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हळद मदत करते. दूध त्वचेला मॉइस्चराइज आणि एक्सफोलिएट करते. त्वचेला टवटवीत ठेवण्यास मदत होते. यासाठी एक चमचा खरबूजाच्या लगदा घ्या आणि त्यामध्ये एक चमचा दूध घाला आणि चांगले मिक्स करा. ही पेस्ट त्वचेवर लावा, 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा कोमट पाण्याने धुवा.

हे सुद्धा वाचा

मध आणि खरबूज

मध त्वचेसाठी फायदेशीर आहे. मधामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचा चमकदार होते. चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण मधाचा आणि खरबूजचा फेसपॅक वापरा. हा फेसपॅक त्वचेला हायड्रेट ठेवते, त्वचेचे अतिरिक्त तेल उत्पादन प्रतिबंधित करते. एका भांड्यात एक चमचा खरबूजचा लगदा घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध घाला. त्यात चिमूटभर हळद टाका, त्याची पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या.

खरबूज आणि बेसन

दूध नैसर्गिकरित्या त्वचेला एक्सफोलिएट करते. हे सनबर्न शांत करण्यास मदत करते. बेसनामध्ये झिंक असते, जे त्वचेचे संक्रमण आणि पुरळ येण्यापासून प्रतिबंधित करते. हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा खरबूजचा लगदा घ्या आणि त्यामध्ये दूध आणि बेसन घाला. मिश्रण चांगले मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा. त्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावा. हे व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स कमी करण्यास देखील मदत करते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)