Skin care : ‘या’ फेसवॉशने चेहऱ्या धुवा आणि चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करा, वाचा!

| Updated on: Jun 20, 2021 | 5:37 PM

आपण चेहऱ्यासाठी काय वापरतो हे सर्वात महत्वाचे आहे. बरेच लोक साबणाने चेहरा धुतात. साबणामुळे आपल्या चेहर्‍याची त्वचा कोरडी होते. म्हणून फेसवॉश करून चेहरा धुण्याची सवय लावा.

Skin care : या फेसवॉशने चेहऱ्या धुवा आणि चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करा, वाचा!
फेशवाॅश
Follow us on

मुंबई : आपण चेहऱ्यासाठी काय वापरतो हे सर्वात महत्वाचे आहे. बरेच लोक साबणाने चेहरा धुतात. साबणामुळे आपल्या चेहर्‍याची त्वचा कोरडी होते. म्हणून फेसवॉश करून चेहरा धुण्याची सवय लावा. फेसवॉश आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवतो. तसेच फेसवॉश निवडताना आपल्या त्वचेचा पोत लक्षात घ्या. बाजारात मिळणाऱ्या फेसवाॅशमध्ये मोठ्या प्रमाणात रासायने वापरली जातात. जी आपल्या त्वचेसाठी हानीकारक असतात. (Make aloe vera facewash at home)

आपण घरगुती पद्धतीने देखील फेसवाॅश तयार करू शकतो. यासाठी आपल्याला कोरफड जेल, गुलाब पाणी आणि चंदन पावडर लागणार आहे. हे सर्व साहित्य मिक्स करू त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा. हे मिश्रण आपण एकदाच तयार करून ठेऊ शकतो. यामुळे आपली त्वचा चांगली होण्यास मदत होते. हा फेसवाॅश घरी तयार करण्यासाठी देखील सोप्पा आहे. कोरडी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ओट्स आणि मधाचा देखील वापर करू शकता. यामुळे तुमची त्वचा मॉइश्चराइज्ड राहील.

मॉइश्चरायझर आपल्या त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवेल. आंघोळ केल्यावर नेहमीच मॉइश्चरायझर वापरा. यामुळे, तुमची त्वचा हायड्रेटेड राहते. मॉइश्चरायझर आपली त्वचा निरोगी ठेवतो. त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्या सौंदर्यतज्ज्ञाला भेटता तेव्हा ते आपल्याला नेहमी साबणाऐवजी फेसवॉश वापरण्याचा सल्ला देतात. कारण फेसवॉश चेहऱ्याच्या त्वचेचा पोत लक्षात ठेवून खास बनवला जातो.

याशिवाय चेहऱ्याचे सौंदर्य जपण्यासाठी आपण आयुर्वेदिक व खास औषधी वनस्पतींपासून बनवलेले साबण वापरू शकता. जर आपल्याला खरोखर आपल्या चेहऱ्याची त्वचा चिरंतन काळासाठी निरोगी ठेवायची असेल, तर नैसर्गिक उपायापेक्षा अधिक उत्तम काहीही नाही. कारण फेस वॉश किंवा काही साबणांमध्ये वापरली जाणारी रसायने त्वचेचे नुकसान करू शकतात. परंतु, नैसर्गिक गोष्टींद्वारे आपला चेहरा सुरक्षित आणि त्वचा निरोगी राहते. नैसर्गिक घटकांमुळे चेहर्‍याला आवश्यक ते पोषण मिळते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Make aloe vera facewash at home)