गुलाब पाण्यात मध मिक्स करा आणि त्वचेला लावा, होतील अनेक फायदे!

| Updated on: Jun 25, 2021 | 7:38 AM

आपल्या सर्वांना त्वचा म्हटंले की, आठवण होते ती म्हणजे फक्त चेहऱ्याच्या त्वचेची, चेहऱ्याची त्वचा चांगली आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो.

गुलाब पाण्यात मध मिक्स करा आणि त्वचेला लावा, होतील अनेक फायदे!
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांना त्वचा म्हटंले की, आठवण होते ती म्हणजे फक्त चेहऱ्याच्या त्वचेची, चेहऱ्याची त्वचा चांगली आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र, हात, पाय आणि इतर शरीराच्या भागाच्या त्वचेकडे आपण दुर्लक्ष करतो. यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा चांगली दिसते आणि हाता पायांची त्वचा खराब होते. आपण ज्याप्रमाणे चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेतो. त्याचप्रमाणे आपण हाता-पायाच्या त्वचेची देखील काळजी घेतली पाहिजे. (Mix honey in rose water and apply on the skin)

गुलाब पाणी आणि मध आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जर आपण गुलाब पाण्यात मध मिक्स करून त्वचेला लावला तर आपली त्वचा सुंदर आणि चमकदार बनते. यासाठी आपल्याला चार ते पाच चमके गुलाब पाणी आणि त्यामध्ये दोन चमचे मध मिक्स करावा लागेल. त्यानंतर ते चांगले मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट आपल्या हाता-पायांना लावा. त्यानंतर 20 मिनिटांनी अंघोळ करा. हे आपण सतत आठ दिवस केले तरी आपल्या त्वचेमध्ये बराच फरक आपल्याला जाणवेल.

गुलाब पाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धुळ माती निघून जाते. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो. यासाठीच त्वचा फ्रेश दिसावी असं वाटत असेल तर घराबाहेर पडताना एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरा आणि सोबत ठेवा. थकवा जाणवू लागल्यास चेहऱ्यावर शिंपडण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे तुम्ही लगेच फ्रेश दिसू शकाल. मध एक नैसर्गिक उत्पादन आहे, जे आपल्या त्वचेतील ओलावा नैसर्गिकरित्या पुन्हा परत आणण्याचे काम करते.

दररोज मध लावल्याने त्वचा मऊ आणि निरोगी दिसते. त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत, जे आपल्या जखमा बऱ्या करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त मध संक्रमण कमी करण्यात देखील मदत करतो. आपल्याला त्वचेची कोणतीही समस्या असल्यास आपण मध वापरू शकता. कोरडेपणाच्या समस्येमुळे आपली त्वचा रुक्ष व निर्जीव दिसत असेल, तर कोरड्या त्वचेपासून मुक्त होऊ इच्छित असल्यास, एक चमचा मधात थोडी केळी कुस्करून मिसळा आणि त्याने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे आपला चेहरा चमकू लागेल

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Mix honey in rose water and apply on the skin)