अननसचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

| Updated on: Jun 20, 2021 | 6:02 PM

अननस खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अननसच्या सेवनामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, अननस हे आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

अननसचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : अननस खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अननसच्या सेवनामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, अननस हे आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आपण अननसाचा फेसपॅक त्वचेला लावला तर त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. विशेष म्हणजे घरच्या घरी अननसाच्या फेसपॅक तयार करण्यासाठी वेळही अत्यंत कमी लागतो. (Pineapple face pack is beneficial for the skin)

अननसाचा फेसपॅक तयार करण्यासाठी अननसाचे दोन काप, दुध चार चमके, हळद एक चमचा आणि एक चमचा चंदन पावडर लागणार आहे. सर्वात अगोदर हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट चेहऱ्यासह मानेला लावा. त्यानंतर साधारण वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा आणि कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपल्याला शक्य आहे, तेंव्हा चेहऱ्याला लावा. यामुळे आपली त्वचा सुंदर होते आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

अननसमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. याशिवाय त्यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म दाह कमी करण्यास मदत करतात. अननस खाल्ल्याने व्हायरल आणि बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो. वृद्धावस्थेत संधिवात एक सामान्य समस्या आहे. यावेळी सांधे सुजतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे जळजळ आणि संधिवात असलेल्या लोकांना वेदना पासून आराम मिळतो.

व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन समृद्ध असलेले हे फळ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. आपण ते खाऊ शकता किंवा त्वचेवर थेट लावू शकता. हे सूर्याच्या हानिकारक किरणांविरूद्ध लढण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यास आणि त्वचा सुधारण्यास मदत करते. अननसामध्ये लोह असते. हे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. हे रक्ताच्या निर्मितीस मदत करते. त्यामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Pineapple face pack is beneficial for the skin)