तांदळाच्या पाण्याचा असाही उपयोग! स्कीन केअरसाठी तांदूळ कसा वापरायचा? जाणून घ्या

| Updated on: Apr 13, 2022 | 6:09 PM

तांदळाच्या पाण्याचा वापर करुन चेहऱ्यावरील पुरळांची समस्या आटोक्यात आणली जाउ शकते. भिजवलेल्या तांदळाच्या पाण्याचा पुरळांना प्रतिबंध करण्यासाठी कसा वापर करता येईल, याबाबत माहिती जाणून घेणे आवश्‍यक ठरणार आहे. या उपायांना तुम्ही तुमच्या स्कीन केअर रुटीनचाही भाग बनवू शकतात.

तांदळाच्या पाण्याचा असाही उपयोग! स्कीन केअरसाठी तांदूळ कसा वापरायचा? जाणून घ्या
सोप्या आणि फायदेशीर स्किर केअरींग टीप्स
Image Credit source: Twitter
Follow us on

भारतासारख्या देशात मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी तांदळाचा वापर केला जातो. केवळ भात, खिचडीच नव्हे तर तांदळापासून इतरही अनेक घटकांची निर्मिती केली जाते. इडली, डोसा, उत्तप्पा हे त्याचेच काही प्रसिध्द प्रकार आहेत. तांदुळ हा शरीरासाठी आरोग्यदायी मानला जातो, लहान मुलांच्या आहारात आवर्जुन तांदळाचा समावेश केला जात असतो. परंतु खाण्याशिवाय तांदळाचा आपल्या स्कीन केअर रुटीनसाठीही (Skin care routine) वापर केला जातो, याची अनेकांना माहिती नाही. तांदळाच्या पाण्याच्या (rice water) माध्यमातून आपण आपल्या चेहऱ्यारवरील पिंपल्सची (Pimples) समस्या दूर करु शकतो. तांदळापासून तुम्ही फेस मास्क तसेच एक चांगले स्क्रबदेखील बनवू शकतात. दरम्यान, तांदळाचे पाणी दोन पध्दतीचे असते. पहिल्या प्रकारात तांदुळ भिजवून त्याचे पाणी तयार केले जाते तर दुसरी प्रकारात तांदुळ पाण्यात उकळून तयार केले जात असते. तांदळाच्या पाण्याचा स्कीन केअरसाठी कसा वापर करावा, हे या लेखातून बघणार आहोत.

लिंबू आणि तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी हे चेहऱ्यावरील पुरळांना मुळापासून नष्ट करते तर लिंबूमुळे त्वचेवर ग्लो निर्माण होत असतो. त्यामुळे हे दोघेही घटक त्वचेच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. तांदळाला पाण्यात भिजवल्याने त्यात प्रोटीन व अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण वाढत असते. तसेच लिंबूमधील व्हिटॅमिन सी त्वचेवर चमक आणण्यासाठी मदत करीत असतो.

याचा वापर करण्यासाठी एका भांड्यात भिजवलेल्या तांदळाचे पाणी घ्यावे, त्यात अर्ध्या लिंबूचा सर मिसळावा. या पाण्याच्या स्वच्छ सुती कापडाच्या मदतीने चेहऱ्यावर लावावा. कोरडे झाल्यावर साध्या पाण्याने धुवावे.

हळद आणि तांदळाचे पाणी

स्कीन केअरसाठी पुरातन काळापासून हळदीचा वापर केला जात आहे. हळदीमधील गुणधर्म त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे असतात. हळदीमध्ये कुरक्युमिन नावा घटक असतो, जो पुरळांवर अत्यंत प्रभावी मानला जात असतो.

त्यामुळे पुरळांवर रामबाण उपाय म्हणूनही हळदीचा वापर केला जात असतो. याचा वापर करण्यासाठी तांदळाच्या पाण्यात एक चमचा हळद टाकून या मिश्रणाला चेहऱ्यावर लावावे, साधारणत: 10 मिनिटांनी चेहरा धुवावा.

कोरफड आणि तांदळाचे पाणी

पुरळांसाठी कोरफडदेखील उपयुक्त ठरत असते. कोरफडीचा गर आणि तांदळाचे पाणी लावल्याने त्वचा चमकदार होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोरफड हे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे त्वचा लवकर कोरडी पडत नाही.

एका भांड्यात तांदळाचे पाणी घ्यावे त्यात दोन चमचे कोरफडीचा गर टाकावा. या मिश्रणाला चेहऱ्यावर लावावे. साधारणत: 15 मिनीटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवावा.

संबंधित बातम्या :

तुमचा स्क्रीनींग टाईम किती आहे? सावध व्हा… त्वचेवरील ‘या’ दुष्परिणामांचा धोका वाढतोय

अँकिलोझिंग स्पॉन्डीलायटिसची प्रक्रिया धीमी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना, वाचा याबद्दल सविस्तर!

Summer drinks : उन्हाळ्यात घरीच बनवा कैरीचे चवदार पेय, जाणून घ्या त्याचे फायदे!

पाहा राज्यातील महत्त्वाची बातमी :