अँकिलोझिंग स्पॉन्डीलायटिसची प्रक्रिया धीमी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना, वाचा याबद्दल सविस्तर!

अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिसचे सर्रास आढळून येणारे लक्षण (Symptoms) म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यावर अगदी लक्षातही येऊ नये इतक्या धीम्या गतीने बळावणारे पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे. अशी पाठदुखी (Back pain) तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू रहिली तर एखाद्या विशेषज्ज्ञाची आणि या बाबतीत एखाद्या संधीवाततज्ज्ञाची (Arthritis) म्हणजे ह्रमॅटोलॉजिस्टची भेट घेणे महत्त्वाचे ठरते.

अँकिलोझिंग स्पॉन्डीलायटिसची प्रक्रिया धीमी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना, वाचा याबद्दल सविस्तर!
अँकिलोझिंग स्पॉन्डीलायटिस म्हणजे नेमके काय याबद्दल जाणून घ्या अधिकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 4:03 PM

मुंबई : अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिसचे सर्रास आढळून येणारे लक्षण (Symptoms) म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यावर अगदी लक्षातही येऊ नये इतक्या धीम्या गतीने बळावणारे पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे. अशी पाठदुखी (Back pain) तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू रहिली तर एखाद्या विशेषज्ज्ञाची आणि या बाबतीत एखाद्या संधीवाततज्ज्ञाची (Arthritis) म्हणजे ह्रमॅटोलॉजिस्टची भेट घेणे महत्त्वाचे ठरते. आपल्या जीवनशैलीविषयी जागरुकतेचा अभाव असल्याने अनेकांना तांत्रिक पाठदुखी आणि दाहकारक स्थितीमुळे उद्भवलेली पाठदुखी यांतला फरक माहीत नसतो. यातील पहिला प्रकार छुपेपणाने हल्ला करतो आणि प्रदीर्घ काळासाठी त्रास देत राहतो तर दुसरा प्रकार अधिक तीव्र स्वरूपाचा असू शकतो व बरेचदा त्याचा संबंध दुखापतीशी असतो.

आजाराचे लवकर निदान होणे अत्यंत आवश्यक

एएसशी संबंधित पाठदुखी ही इन्फ्लेमेटरी म्हणजेच दाहकारक स्थितीमुळे उद्भवणारी असते. आपली रोगप्रतिकारशक्ती जेव्हा गफलतीने पाठीच्या मणक्यांतील सांध्यांवर हल्ला करते तेव्हा ही स्थिती उद्भवते. भारतामध्ये अंदाजे 69 टक्‍के रुग्णांची हृमॅटोलॉजिट्सशी भेट होण्याआधी त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले जाते व त्यावर चुकीचे उपचार केले जातात. 1 रुग्णांमध्ये दीर्घकालीन वेदनांचे प्रमाण किमान पातळीवर राखण्यासाठी आणि हा आजार बळावत जाण्याची प्रक्रिया धीमी व्हावी याची काळजी घेण्यासाठी या आजाराचे लवकर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे.

डोळे, त्वचा आणि आतड्यांवरही परिणाम होऊ शकतो

डॉ. प्रविण पाटील, हृमॅटोलॉजिस्ट, एमआरसीप, एफआरसीपी, सीसीटी-हृमॅटोलॉजी, पुणे म्हणाले, “सकृतदर्शनी कोणतेही कारण नसताना आपली यंत्रणा अतिसक्रिय होते आणि चुकून आपल्याच निरोगी उतींवर हल्ला सुरू करते. यामुळे पाठीच्या मणक्यातील सांध्यांना सूज येते. यामुळे डोळे, त्वचा आणि आतड्यांवरही परिणाम होऊ शकतो. उपचार न मिळाल्यास सांध्यांना कायमची इजा पोहोचू शकते.”

डॉ. पाटील पुढे सांगतात, ”स्पॉन्डिलायटिसचे निदान झालेल्या सर्वच नव्हे पण ब-याचशा रुग्णांमध्ये एचएलए-बी27 नावाचे जनुक असते. हे जनुक असणा-या व्यक्तींना स्पॉन्डिलायटिस होण्याची शक्यता अधिक असते. मात्र या स्थितीचे कोणतेही लक्षण नसलेल्या 8 टक्‍के धडधाकट लोकांमध्येही हे जनुक आढळून येते. म्हणजे, हे जनुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या आजाराचा सामना करावा लागतोच असे नाही. मात्र परिस्थिती आणि जीवनशैली यांमुळे हे जनुक अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता वाढू शकते.”

एएसची स्थिती बळावू नये यासाठीचे काही उपाय:

  1. हृमॅटोलॉजिस्टबरोबर सल्लामसलत करणे: एएस हा बरा न होणारा आजार आहे. त्याचे लवकर निदान होण्यासाठी या स्थितीची चिन्हे आणि लक्षणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बहुतेक रुग्ण हृमॅटोलॉजिस्टकडे जाण्याआधी आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे किंवा हाडांच्या डॉक्टरांकडे जात राहतात.
  2. नियमित उपचार: एकदा का या आजाराचे निदान झाले की, त्याची लक्षणे गंभीर होऊ नयेत आणि वेदना सुसह्य व्हाव्यात यासाठी अचूक उपचारांची मदत होऊ शकते. आजाराने गंभीर स्वरूप धारण करू नये आणि कोणतीही अतिरिक्त गुंतागुंत उद्भवू नये यासाठी उपचार हीच गुरुकिल्ली आहे. रुग्णाला साजेशी ठरू शकेल अशा प्रकारची उपचारपद्धती शोधण्यासाठी डॉक्टरांच्या निकट संपर्कात राहून उपाय शोधणे महत्त्वाचे ठरते. निदानानुसार उपचारांमध्ये बायोलॉजिक औषधांचा समावेश केला जाऊ शकते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तींच्या मणक्यांना आलेली सूज अधिक वाढण्यास प्रतिबंध करता येतो.
  3. जीवनशैलीतील बदल: एएस सारख्या स्थितीचे व्यवस्थापन करताना जीवनशैली अत्यंत महत्त्वाची ठरते. तांत्रिक दुखण्यामध्ये रुग्णाला आराम करून बरे वाटते, त्याउलट आजारात हालचालीमुळे स्थिती अधिक सुसह्य होते. पोहणे, योगा, धावणे, हलकेफुलके व्यायाम यांसारखे व्यायाम नियमितपणे केल्याने हाडे आणि सांध्यांची हालचाल होत राहते व त्यामुळे हा आजार बळावण्याची प्रक्रिया मंदावते.
  4. योग्य आहार: ड, ई जीवनसत्त्व, ओमेगा ३ मेदाम्ले आणि कॅल्शियम यांनी समृद्ध आहार घेतल्याने हाडे बळकट होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. धूम्रपान आणि मद्यपान टाळणे अनिवार्य आहे. अयोग्य जीवनशैली आणि अनारोग्यकारक परिस्थितीमुळे एएसची तीव्रता वाढते.
  5. एएसच्या स्थितीवर कोणताही विशिष्ट उपाय नाही हे खरे असले तरीही या आजाराचे व्यवस्थापन शक्य आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. रुग्णांनी उपचारांचे काटेकोरपणे पालन करायला हवे आणि त्यासोबतच जीवनशैली आणि आहारामध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत. याचा ही स्थिती अधिक बिकट बनत जाण्याची प्रक्रिया धीमी करण्याच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो.

आजाराचे लवकर आणि अचूक निदान झाल्यास आजार गंभीर होत जाण्याची प्रक्रिया ब-यापैकी धीमी होऊ शकते व त्याची तीव्रताही कमी होऊ शकते. नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात या गोष्टींची औषधोपचारांना जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. एएसच्या व्यवस्थापनामध्ये अलिकडे बरीच प्रगती झाली आहे व त्यामुळे उपचारांचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. वेदना कमी करणे, व्यायाम आणि आजाराचे स्वरूप आटोक्यात ठेवणारी औषधे यांच्या मदतीने या रोगाचे व्यवस्थापन केले जाते. यातील सर्वात महत्त्वाची प्रगती म्हणजे बायोलॉजिक्स नावाने ओळखल्या जाणा-या औषधांचा विकास. आजाराला गंभीर स्वरूप धारण करण्यापासून रोखणे, वेदना आणि मणक्यातील ताठरपणा कमी करणे आणि पाठीचा कणा लवचिक राखणे व त्यायोगे तुम्हाला आपले आयुष्य सर्वसामान्य पद्धतीने जगता यावे यासाठी मदत करणे हे आधुनिक उपचारांचे लक्ष्य आहे.” डॉ. पाटील पुढे म्हणाले.

संबंधित बातम्या : 

Summer drinks : उन्हाळ्यात घरीच बनवा कैरीचे चवदार पेय, जाणून घ्या त्याचे फायदे!

Watermelon Juice : उष्णतेवर मात करण्यासाठी कलिंगडचा ज्यूस प्या, वाचा आरोग्य फायदे!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.