AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election News LIVE : उमेदवारांना मराठीसह इंग्रजीत सादर करता येणार शपथपत्र

| Updated on: Dec 26, 2025 | 9:30 AM
Share

BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: दोन्ही राष्ट्रवादीत गुप्त बैठकांचे सत्र सुरू आहे. आज जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चाचपणी सुद्धा सुरु आहे. तर प्रकाश महाजन हे शिंदे सेनेत जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra Election News LIVE : उमेदवारांना मराठीसह इंग्रजीत सादर करता येणार शपथपत्र

LIVE NEWS & UPDATES

  • 26 Dec 2025 09:50 AM (IST)

    KDMC निवडणुकीपूर्वी 27 गावांचा निवडणूक बहिष्कार

    स्वतंत्र नगरपालिका मागणी फेटाळल्याने सर्वपक्षीय संघर्ष समिती आक्रमक. सर्व राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांना निवडणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन. बहिष्कार झुगारल्यास निवडणुकीत सक्रिय हस्तक्षेप करून चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा. संघर्ष समितीच्या निर्णयामुळे पालिकेच्या निवडणुकीत पॅनल क्रमांक 13, 16, 17, 19, 30 व 31 वर मोठा राजकीय परिणाम संभव

  • 26 Dec 2025 09:40 AM (IST)

    राजकीय पक्ष भाजप असा उल्लेख असल्यास एबी फॉर्म फक्त एकाच उमेदवाराच्या नावाचा, उर्वरित तीन अर्ज बाद होणार 

    अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराचा एबी फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्याकडे देणार- सूत्रांची माहिती बंडखोरी रोखण्यासाठी भाजपची शेवटच्या दिवशी रणनीती 30 डिसेंबर रोजी एबी फॉर्म देण्याची तयारी. इच्छुक उमेदवारांना बसू शकतो मोठा फटका एका जागेसाठी चार उमेदवारांचे अर्ज.

  • 26 Dec 2025 09:30 AM (IST)

    KDMC निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेने कडून समन्वय समिती स्थापना

    भाजपचे 7 तर शिवसेनेचे 6 सदस्य समितीत सहभागी…आतापर्यंत दोन महत्त्वाच्या बैठका संपन्न. मात्र जागावाटपावर तणाव कायम.बदलापूर-अंबरनाथ विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला; कल्याण-डोंबिवलीत 5 वर्षांचे महापौर आणि ८३ जागांची केली मागणी. आमच्या मागण्या मान्य केल्या तर युती करू अन्यथा भाजप कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत नाराजी सूर स्वतंत्र लढण्याची मानसिकता भाजप माजी आमदार नरेंद्र पवार

  • 26 Dec 2025 09:29 AM (IST)

    अजित पवारांकडून साधारण 30 जागा देण्याची भूमिका

    पुणे महानगरपालिका निवडणुकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांकडे ४० ते ४५ जागांची मागणी. अजित पवारांकडून साधारण ३० जागा देण्याची भूमिका. कालच्या बैठकीनंतर ही जागा वाटपाचा तिढा अद्याप ही कायम

  • 26 Dec 2025 09:20 AM (IST)

    नाशिकमध्ये देखील अद्याप महायुतीत ठरेना

    आज पुन्हा गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता. 45 जागांवर शिवसेना ठाम सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्रपणे लढण्याची देखील शिवसेनेची तयारी. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू आहे युती करण्यासंदर्भात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये चर्चा. आज सकारात्मक चर्चा न झाल्यास स्वतंत्रपणे लढण्याचा होऊ शकतो निर्णय

  • 26 Dec 2025 09:10 AM (IST)

    नाशिकमध्ये जागावाटपावरुन होणारे वाद टाळण्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडीचा नवा पॅटर्न

    प्रभागात ज्या पक्षाकडे स्ट्रॉंग उमेदवार असेल ति जागा त्या पक्षाला सुटणार. काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा. ठाकरे बंधू एकत्र येताच नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय

  • 26 Dec 2025 09:00 AM (IST)

    निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीमधील जागा वाटपाचा तिढा सुटेना

    महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यात जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होणार आहे.त्यामध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकीसाठी एकत्र येण्यासंदर्भातील घोषणा आज होणार होती मात्र आता रविवारी होण्याची शक्‍यता आहे.

  • 26 Dec 2025 08:55 AM (IST)

    शिवसेना भाजपा युतीचा पेच कायम

    छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपा युतीचा पेच अजून काही सुटलेला नाही.युती संदर्भात दोन्ही पक्षाच्या पाच बैठका निष्फळ ठरत आहेत. आज पुन्हा भाजपा आणि शिवसेनेची युती आणि जागा वाटप संदर्भात बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे आमदार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. युती आणि जागा वाटपाचा तिढा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

  • 26 Dec 2025 08:45 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल रॅली

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आज संध्याकाळी 6 वाजता मशाल रॅली काढण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या या मशाल रॅलीला युवा सेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या मशाल रॅलीमध्ये उपस्थित राहण्याचे माजी विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आवाहन केले आहे. क्रांती चौक ते गुलमंडी मशाल रॅली काढण्यात येणार आहे.

  • 26 Dec 2025 08:35 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरला हवाई नकाशावरून ‘डिसकनेक्ट’ करण्याचा उद्योग

    ऐन पर्यटन हंगामात छत्रपती संभाजीनगरला हवाई नकाशावरून ‘डिसकनेक्ट’ करण्याचा उद्योग इंडिगो एअरलाइन्सने सुरूच ठेवला आहे. सुरुवातीला केवळ १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केलेली हैदराबाद-छत्रपती संभाजीनगर दुपारची हवाई सेवा आता संपूर्ण हिवाळी सत्रासाठी (मार्चपर्यंत) रद्द करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.विमानांची कमतरता आणि केंद्र सरकारच्या उडान योजनेतील अनुदानाचा फायदा घेण्यासाठी इंडिगोने प्रवाशांना वाऱ्यावर सोडले आहे. हैदराबादहून दुपारी १०:५५ वाजता निघून १२:२५ वाजता शहरात येणारे आणि दुपारी १२:५५ वाजता परतीसाठी झेपावणारे विमान अत्यंत लोकप्रिय होते.या नियमित सेवेला आधी आठवड्यातून तीन दिवस केले. त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत स्थगितीचे नाटक केले आहे.

  • 26 Dec 2025 08:25 AM (IST)

    सांगलीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलखाती सुरू

    सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. सांगलीतल्या आमराई क्लब या ठिकाणी आमदार जयंत पाटील,आमदार कदम आणि खासदार विशाल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात येत आहेत.महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित करून लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.त्या दृष्टीने आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील एकत्रित पार पडत असून ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

  • 26 Dec 2025 08:17 AM (IST)

    अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा आंदोलन

    बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन सुरु आहे.राजकमल चौकात हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन सुरु आहे.बांगलादेश सरकार विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली आहे.

मुंबईतील जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेच्या चर्चेची फेरी सुरू आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर नाशिकमध्ये ठाकरे सेनेतील माजी महापौर हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे निष्ठावंत नाराज झाले आहेत. तर पुण्यामध्ये काका-पुतण्यामधील जागा वाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. तर सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनिकरणाची चर्चा सुद्धा सुरू आहे. मनपा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र हे दोन्ही भाषेत इंग्रजी आणि मराठीत देता येणार आहे. प्रकाश महाजन हे शिंदे सेनेत जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात नोटांचे मोठे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर रेल्वे प्रवास महागला आहे. एससी पासून ते सर्वसाधारण कोचच्या तिकीटाचे दर वाढले आहेत.

Published On - Dec 26,2025 8:06 AM

Follow us
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.