पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी; जाणून घ्या नेमके काय आहेत उपाय

| Updated on: Jul 14, 2021 | 1:10 AM

पावसाळ्यात आपल्या केसांच्या सौंदर्यावर परिणाम होऊ शकतो. हवेतील वाढलेल्या आर्द्रतेचा केसांवर परिणाम होऊ शकतो. पावसात केस भिजतात, त्याचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी; जाणून घ्या नेमके काय आहेत उपाय
पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी; जाणून घ्या नेमके काय आहेत उपाय
Follow us on

मुंबई : सध्या पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याविषयी ज्या प्रमाणात काळजी घेणे गरजेचे आहे, तितकीच काळजी आपल्याला आपल्या सौन्दर्याचीही घ्यायला हवी. केसदेखील आपले सौंदर्य वाढवतात. पावसाळ्यात आपल्या केसांच्या सौंदर्यावर परिणाम होऊ शकतो. हवेतील वाढलेल्या आर्द्रतेचा केसांवर परिणाम होऊ शकतो. पावसात केस भिजतात, त्याचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. (Take care of your hair in the rainy season; know exactly what the solutions are)

कंडिशनरचा वापर

जास्त आर्द्रता आपले केस खराब करू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या केसांना सुरक्षित ठेवण्यासाठी कंडिशनरचा वापर करू शकता. तुम्ही तुमच्या केसांनुसार कंडिशनरची निवड करू शकता. कंडिशनर तुमचे केस मुलायम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. तुम्ही केस धुतल्यानंतर कंडिशनरचा अवश्य वापर करा. कंडिशनरमुळे तुमच्या केसांचे बाह्य नुकसानांपासून संरक्षण होते.

केसांना तेल लावणे गरजेचे

केसांना तेल जरूर लावा. त्याची तुमचे केस मजबूत बनविण्यासाठी मोठी मदत होते. केसांच्या आरोग्यासाठी तुम्ही नियमितपणे केसांना तेल लावू शकता. पावसाळ्यात नियमितपणे केसांवर तेल घालणे आवश्यक आहे. तेलदेखील तुमच्या केसांच्या प्रकारानुसार निवड करू शकता. तेलामुळे केस गळत नाहीत. तसेच इतर समस्यांपासून केसांचे संरक्षण होते. तेल केसांना निरोगी ठेवण्यास उपयुक्त असते.

ओल्या केसांवर फणी फिरवू नका

पावसाळ्यात जर तुम्ही बाहेरून भिजून घरात आला असाल, तर भिजलेल्या केसांवर फणी फिरवू नका. अर्थात ओले केस विंचरू नका. पावसाचे पाणी तुमच्या केसांच्या फॉलिकल्सला कमकुवत बनवतात. त्यामुळे तुमचे केस गळण्याची शक्यता वाढते. पावसात भिजून घरात आल्यानंतर सर्वात आधी आपले केस नीट पुसा. कारण केस स्वच्छ पुसल्याने सर्दी-खोकला होण्यापासून तुमचे संरक्षण होईलच, त्याचबरोबर केसांचे आरोग्य उत्तम राहील. अर्थात केस गळण्याची समस्या उद्भवणार नाही. केस टॉवेलने नीट सुके केल्यानंतर तुम्ही फणी फिरवू शकता.

स्कार्फ किंवा टोपीचा वापर करा

पावसाळ्यात आला म्हणून स्कार्फ किंवा टोपीचा वापर करणे थांबवू नका. जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता, तेव्हा आपल्यासोबत स्कार्फ किंवा टोपी आहे ना, याची आधी खात्री करून घ्या. घराबाहेर असताना केस पूर्णतः झाकून ठेवा. प्रदूषणापासून केसांचे रक्षण करण्यासाठी ही खबरदारी घ्या. बाहेरचे प्रदूषण तुमचे केस खराब करू शकते. स्कार्फ किंवा टोपीचा वापर केल्यामुळे केसांच्या समस्या उद्भवत नाहीत. पावसाळ्यात ही खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. (Take care of your hair in the rainy season; know exactly what the solutions are)

इतर बातम्या

AICTE Revised Calendar 2021 : एआयसीटीईचे सुधारीत कॅलेंडर जारी, अभियांत्रिकी महाविद्यालयांचे वर्ग 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार

NEET 2021 परीक्षेत मोठा बदल, JEE Main प्रमाणे असतील पर्यायी प्रश्न