Homemade Face Mask : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ 5 होममेड फेस मास्क फायदेशीर! 

| Updated on: Nov 24, 2021 | 10:10 AM

ताणतणाव आणि व्यस्त जीवनशैलीमुळे आपली त्वचा खराब होत आहे. घरचे आणि आॅफिसचे काम सांभाळत असताना आपण आपल्या त्वचेकडे दुर्लक्ष करतो. यामुळे त्वचेवर  बारीक रेषा आणि मोठे छिद्र तयार होतात.  हे थांबण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

Homemade Face Mask : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी हे 5 होममेड फेस मास्क फायदेशीर! 
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : ताणतणाव आणि व्यस्त जीवनशैलीमुळे आपली त्वचा खराब होत आहे. घरचे आणि आॅफिसचे काम सांभाळत असताना आपण आपल्या त्वचेकडे दुर्लक्ष करतो. यामुळे त्वचेवर  बारीक रेषा आणि मोठे छिद्र तयार होतात.  हे थांबण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. हे घरगुती उपाय नेमके कोणते हे आपण बघणार आहोत.

गाजर, दही आणि मध

गाजरमध्ये कोलेजन भरपूर प्रमाणात असते. त्यात व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. चेहऱ्यावरील बारीक रेषांची समस्या दूर करण्यासाठी एक उकडलेले गाजर, मध आणि दही आपल्याला लागणार आहे. हा पॅक तयार करण्यासाठी तीन चमचे गाजराची पेस्ट, एक चमचा मध आणि दोन चमचे दही मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा धुवा.

किवी आणि साखर

किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे कोलेजनच्या निर्मितीसाठी खूप फायदेशीर आहे. किवीचा फेसमास्क चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. यासाठी एक मॅश केलेली किवी घ्या. त्यामध्ये दोन चमचे साखर मिक्स करा आणि ही पेस्ट चांगली मिक्स करा. साधारण दहा मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

भोपळा आणि बदाम

भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. भोपळ्याचा फेसमास्क घरी तयार करून चेहऱ्याला लावला तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. हा फेसमास्क घरी तयार करण्यासाठी तुम्हाला एक कप मध, भोपळ्याची पेस्ट, एक कप साधे दही, बदाम आणि ऑलिव्ह ऑइल लागेल. सर्व घटक मिसळा आणि त्वचेवर लावा. 10 मिनिटांनंतर तुम्ही ते धुवून मॉइश्चरायझर लावू शकता.

पपई आणि लिंबाचा रस

पपईचा फेसमास्क चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा मास्क घरी तयार करण्यासाठी आपल्याला पपईची पेस्ट तीन चमचे, लिंबाचा रस दोन चमचे आणि गुलाब पाणी लागणार आहे. यासाठी वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यानंतर वीस मिनिटांनी आपला चेहरा धुवा. आठ दिवसातून दोनदा हा उपाय परत करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!