Hair | उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी हे होममेड हेअर मास्क अत्यंत फायदेशीर!

| Updated on: May 24, 2022 | 11:54 AM

एका भांड्यात 3 चमचे आवळा पावडर घ्या. त्यामध्ये दोन लिंबाचा रस घाला. ते चांगले मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि टाळूला मसाज करा. तासभर तसंच राहू द्या आणि मग शाम्पूने केस धुवा. तुम्ही ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

Hair | उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी हे होममेड हेअर मास्क अत्यंत फायदेशीर!
Image Credit source: unsplash.com
Follow us on

मुंबई : उन्हाळ्यात (Summer) कडक सूर्यप्रकाशामुळे केसांची वाट लागते. मात्र, आपण त्वचेची काळजी घेण्याच्या नादामध्ये केसांकडे दुर्लक्ष करतो. यामुळे केसांच्या समस्या वाढतात आणि केस गळती सुरू होते. केसांना पीसल्यामुळे, खाज सुटते आणि प्रदूषण, धुळीमुळे टाळूवर घाण जमा होते. यामुळे केस (Hair) कमकुवत होतात, त्यामुळे केस गळणे, तुटणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण होममेड हेअर मास्क वापरू शकतो. ज्यामुळे केस गळतीही कमी होते. हे हेअर मास्क (Hair mask) नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवले जातात. हे तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत, चला तर जाणून घेऊयात सुंदर केसांसाठी कशाप्रकारे हेअर मास्क तयार करायचे.

दही आणि कोरफड

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आपण दोन चमचे दही घ्यावे आणि त्यामध्ये चार चमचे कोरफड जेल घाला मिक्स करा. हा हेअर मास्क टाळूवर आणि केसांवर लावा. थोडा वेळ मसाज करा. यानंतर 40 मिनिटे टाळूवर राहू द्या. यानंतर केस शाम्पूने धुवा. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता. कोरफडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशनमध्ये मदत करते. तर दह्यामुळे आपले केस चमकदार आणि मऊ होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

आवळा आणि लिंबाचा रस

एका भांड्यात 3 चमचे आवळा पावडर घ्या. त्यामध्ये दोन लिंबाचा रस घाला. ते चांगले मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि टाळूला मसाज करा. तासभर तसंच राहू द्या आणि मग शाम्पूने केस धुवा. तुम्ही ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आपण केस धुताना आवळ्याची पावडर केसांना लावायला हवी. यामुळे केसांमधील कोंडा दूर जाण्यास मदत होते.

खोबरेल तेल आणि जास्वंद

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, खोबरेल तेल आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. तर जास्वंदाचे फुल हे केसांच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत करते. हा खास हेअर मास्क तयार करण्यासाठी पाच जास्वंदाची फुले घ्या आणि त्याच्या पाकळ्या काढून घ्या. पाकळ्या धुवून बारीक करून घ्या. त्यात खोबरेल तेल घाला. हा हेअर मास्क टाळूवर आणि केसांच्या लांबीवर लावा. वीस मिनिटे हा हेअर मास्क केसांवर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने आपले केस धुवा.