झिरो फिगरसाठी तुमच्या डाएटमध्ये ‘या’ सुपरफूडचा नक्की समावेश करा…

| Updated on: Apr 22, 2022 | 1:44 PM

अनेक महिलांना आपले वजन नियंत्रित करायचे असते. परंतु त्यासाठी त्यांनी नेमका कुठला डाएट प्लान ठेवावा हे समजत नाही. या लेखात आम्ही अशा काही पदार्थांची माहिती घेउन आलोय, की जे तुम्हाला तुमचे वजन मेंटेन ठेण्यासाठी मदत करतील शिवाय या पदार्थांच्या सेवनाने तुमच्या शरीराला उर्जादेखील मिळेल.

झिरो फिगरसाठी तुमच्या डाएटमध्ये ‘या’ सुपरफूडचा नक्की समावेश करा...
Diet Plan
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः धावपळीचे जीवन, बदलती जीवनशैली (Lifestyle) आदींमुळे अनियंत्रित वजनाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांमध्ये लठ्ठपणाची समस्या आहे. त्यामुळे वजन कमी करुन सडपातळ होण्यासाठी आहारात कुठल्या गोष्टींचा समावेश करावा? असा अनेकांना प्रश्‍न पडत असतो. सोशल मीडियावर विविध डाएट प्लान (Diet plan) सांगण्यात येत असतात. परंतु त्यावर किती विश्‍वास ठेवावा, हाही एक प्रश्‍नच आहे. आजकाल महिलांना विविध शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्यामध्ये इनफर्टिलिटी, कुपोषण, कमजोरी, इम्यून सिस्टीमबाबत (Immune system) विविध आजारांचा त्यात समावेश होत असतो. या सर्वांमध्ये वजन नियंत्रित ठेवणे खूप आवश्‍यक आहे. तुम्ही सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करुनही तुमचे वजन नियंत्रित करु शकतात, जाणून घेउया अशा सुपरफूड्‌सबद्दल…

सुका मेवा आणि बिया

सुका मेवा आणि विविध बियांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज् असतात. या माध्यमातून शरीराला उर्जा मिळत असते. याच्या सेवनामुळे शरीराला आवश्‍यक सर्व पोषक घटक मिळत असतात. यात चांगल्या प्रमाणात प्रोटीनदेखील असते. हे आरोग्यासाठी खूप लाभदायी ठरत असते. रोज एक मुठ्ठी सुका मेवा खाल्ल्याने याचा शरीराला चांगला फायदा होतो. दही, स्मूदी तसेच शेकमध्ये मिसळूनही याचे सेवन केले जाउ शकते. खजूर, काजू, बदाम, पिस्ता आदी विविध पदार्थांपासून शरीराला खूप उर्जा मिळत असते. याशिवाय हे पदार्थ ओट्‌समध्ये टाकूनही ते तुम्ही आहारात घेउ शकतात.

अंड आणि पनीर

अंड आणि पनीर प्रोटीनचे दोन मोठे स्त्रोत आहेत. याचा आहारात नक्की समावेश केला पाहिजे. अंड मांसपेशींच्या मजबुतीसाठी चांगले असते. या दोन्ही घटकांचा वापर करुन तुम्ही विविध पदार्थांची निर्मिती करु शकतात.

बटाटे आणि भात

बटाटे आणि भात, खिचडीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट असतात. त्यामुळे शरीरला चांगली उर्जा मिळत असते. हे दोन्ही घटक पचायला हलके असते. यात मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.

दूध आणि दही

दूध आणि दह्याचा रोजच्या आहारात वापर असायला हवा. यापासून कार्बोहाईड्रेट आणि प्रोटीनदेखील मिळत असते. याशिवाय यात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअमदेखील असते. यामुळे हाड आणि दात मजबूत राहतात. तुम्ही शेक किंवा स्कूदीच्या स्वरुपातदेखील दूध व दह्याचा वापर करु शकतात.

(टीप : सदर मजकूर उपलब्ध माहितीच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. कृपया याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आहार तज्ज्ञांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.)

संबंधित बातम्या

मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या ताटात ‘हे’ पदार्थ दिसायलाही नको, अन्यथा डोळ्यांपासून किडनीपर्यंत होतील गंभीर दुष्परिणाम!

Sanjay Raut on Devendra Fadnavis : अडीच वर्षापूर्वी तुम्हाला सुबुद्धी मिळाली असती तर मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

आई होऊ न शकल्यानं महिला डॉक्टरची आत्महत्या! स्वतःच विषारी इंजेक्शन टोचून घेत जीव दिला