ड्रायफ्रुट्स खराब होण्याची चिंता सतावते? अशा पद्धतीने साठवा, वर्षभर राहील फ्रेश

ड्रायफ्रुट्स आणि नट्स हे आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी मानले जात नाहीत कारण त्यात अनेक पोषक तत्वे असतात, परंतु जर ते योग्यरित्या स्टोर केले नाहीत तर त्यांचे पोषक तत्व कमी होऊ शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण ड्रायफ्रुट्स जास्त दिवस कसे साठवता येईल तसेच योग्य पद्धत जाणून घेऊयात...

ड्रायफ्रुट्स खराब होण्याची चिंता सतावते? अशा पद्धतीने साठवा, वर्षभर राहील फ्रेश
dry fruits
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 26, 2025 | 2:27 PM

ड्रायफ्रुट्स हे चांगले फॅट आणि अनेक जीवनसत्त्वे व खनिजांचा एक चांगला स्रोत आहे, म्हणून दैनंदिन आहारात मर्यादित प्रमाणात नट्स आणि ड्रायफ्रुट्स समाविष्ट केले पाहिजेत. ऊर्जा वाढवणाऱ्या स्नॅक्सचा विचार केला तरी, नट्स, ड्रायफ्रुट्स यांचे मिश्रण सर्वोत्तम आहे. अशातच जर ते योग्यरित्या साठवून ठेवले गेले नाहीत तर ओलावा किंवा खूप गरम तापमानात त्यांचे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते. नट्स, सुकामेवा कशा प्रकारे साठवून ठेवू शकतो ते जाणून घेऊया जेणेकरून त्यांचे शेल्फ लाइफ देखील जास्त राहील आणि चवीसोबत पोषक तत्वांचे प्रमाणही अबाधित राहील.

ड्रायफ्रुट्स, नट्स योग्यरित्या साठवणे महत्वाचे आहे जेणेकरून त्यांचे पौष्टिक मूल्य अबाधित राहील. जर ते ओले झाले तर त्यांचे शेल्फ लाइफ कमी होते आणि विचित्र वासासह बुरशीची भीती असते. तर जास्त उष्णतेमुळे काजू आणि बियांमधील तेल कमी होते, ज्यामुळे त्यांच्या पौष्टिक मूल्यावर परिणाम होऊ शकतो.

बराच काळ कसे साठवायचे?

फ्रीझिंगमुळे ड्रायफ्रुट्स बराच काळ किंवा अनेक महिने ताजे राहू शकतात. परंतु त्यात अजिबात ओलावा नसावा, म्हणून, नेहमी फ्रीजर सेफ बॅग्ज किंवा कंटेनर वापर करा. ​​यामुळे बिया आणि नट्सचा क्रंचही टिकून राहतो. जी लोकं ड्रायफ्रुट्स साठा जास्त प्रमाणात करतात त्यांच्यासाठी ही पद्धत सर्वोत्तम आहे.

सुका मेवा अशा ठिकाणी ठेवा

जर तुम्हाला काही महिन्यांसाठी ड्रायफ्रुट्स साठवायचे असेल, तर तुम्ही ते सामान्यतः थंड ठिकाणी ठेवू शकता, परंतु ही जागा पूर्णपणे कोरडी असावी. तसेच सुर्यप्रकाश आणि उष्णतेपासून दूर ड्रायफ्रुट्स ठेवा आणि कंटेनर असा असावा की कोणत्याही प्रकारचा ओलावा त्यात पोहोचू नये.

ओलावा टाळण्यासाठी हे करा

ओलावा शोषला जाऊ नये म्हणून, तुम्ही फूड ग्रेड सिलिका जेल पॅकेट्स वापरू शकता. तुम्ही ही पॅकेट्स जारच्या आत ठेवू शकता, ज्यामुळे बुरशी आणि ओलावा टाळता येतो.

भाजून ठेवा

तुम्ही नट्स आणि बिया भाजून साठवू शकता. यामुळे ड्रायफ्रुट्सचा कुरकुरीतपणा आणि चवही वाढेलच, शिवाय ओलावा सुकून गेल्यामुळे ते जास्त दिवस टिकूनही राहतील. भाजण्यासाठी कोणत्याही प्रकारची तेल व तुप वापरू नका.

शरीराला अनेक फायदे 

हृदय निरोगी ठेवण्यापासून ते त्वचा तरुण ठेवण्यापर्यंत, योग्य रक्त पुरवठा राखण्यापर्यंत, आहारात ड्रायफ्रुट्स, नट्स आणि बियांचा समावेश करणे चांगले आहे, कारण ते आपल्या शरीरातील अनेक सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता पूर्ण करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)