
फॅशन ट्रेन्ड कायम बदलत असतो. आता अनेक मुली जिन्सवर कुर्ता घालणं पसंत करतात. कारण ते दिसयाला देखील फार छान वाटतं… पण अनेक मुलींना रेडीमेड कुर्ता आवडत नाही. तर कधीकधी रेडीमेड कुर्ते व्यवस्थित फिट देखील बसत नाहीत. त्यामुळे अनेक मुली कुर्ते शिवून घेतात. पण कापड फार महाग मिळतं. अशात मुंबईत काही असे मार्केत आहेत, जीथे फक्त पारंपरिक कपेडच नाही तर, ताग्यातील कापड देखील स्वस्त आणि मस्त मिळतात… त्यामुळे जाणून घ्या मुंबईत मार्केट कुठे आहेत घ्या जाणून. एवढंच नाही तर, थोडं बार्गेन केल्यानंतर तुम्हाला चांगल्या स्वस्त दरात कापड खरेदी करून कुर्ता शिवू शकता.
प्रत्येक शहरामध्ये असे मार्केट असतात जे स्वस्त आणि तेथे चांगले कपडे मिळतात. मुंबईमध्ये देखील असे अनेक मार्केट आहेत, ज्याठिकाणी वेग-वेगळ्या प्रकारचे कपडे आणि इतर लागणाऱ्या वस्तू देखील मिळतात…
मुळजी जेठा मार्केट (MJ Market) : मुंबईतील काळबादेवी परिसरातील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध कापड बाजारपेठ आहे.हे मार्केट सर्वात जुनं आणि मोठे कापड बाजार म्हणून ओळखलं जातं. येथे तुम्हाला बांधणी (Bandhani), प्रिंटेड कॉटन, सिल्क, लेस व इतर विविध टाइपचे फॅब्रिक मिळतात. ह्या क्षेत्रात दुकानदारांची रेलचेल, कमी दरात थोक कापड सुद्धा मिळतं. विशेषतः या मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेंडी कुर्ता शिवण्यासाठी चांगले कापड मिळेल.
मंगलदास मार्केट (Mangaldas Market) : मुंबईचा सर्वात प्रसिद्ध कापड बाजार म्हणजे मंगलदास मार्केट… इथे कॉटन, लिनन, सिल्क, साडी मटेरियल, प्रिंटेड फॅब्रिक, बंधणी सारखे प्रकार सर्वात मोठ्या कलेक्शनने मिळतात. सर्वात म्हत्त्वाचं म्हणजे या मार्केटमध्ये तुम्हाला ताग्यातील कापड देखील फार चांगलं आणि कमी दरात मिळेल..
नटराज बाजारात (Natraj Market) : मलाड याठिकाणी असलेला हा कपड्यांचा मार्केट स्वस्त आणि मस्त आहे. कृत्रिम दागिने, ट्रेंडी स्ट्रीट फॅशन, एथनिक पोशाख, परवडणारे दागिने, गृहसजावटीच्या वस्तू, चप्पल आणि अतुलनीय किमतीत बॅग्ज तुम्ही या बाजारत खरेदी करु शकता.
दादर ईस्ट येथे देखील मोठा पारंपरिक कपड्यांचा मार्केट आहे. जीथे तुम्ही फक्त साड्या आणि ड्रेस नाही तर, कुर्ता देखील खरेदी करु शकता… वेगवेगळ्या डिझाईन आणि पॅटर्नमध्ये याठिकाणी कुर्ता असतात. शिवाय कॉर्ड सेट देखील तुम्ही खरेदी करु शकता.
दक्षिण मुंबईमध्ये असलेलं कोलाबा कॉजवे मार्केट शॉपिंगसाठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. येथे बुटीकपासून ते फूटपाथपर्यंत दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी असते. येथे तुम्हाला पारंपरिक नाही पण ट्रेंडी कपडे, ॲक्सेसरीज आणि चप्पलांचे शेकडो डिझाईन्स मिळू शकतात.