AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे तर… स्वामी गोविंददेवगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

Swami Govinddevgiri Maharaj Controversial Statement: बऱ्याच दिवसांपासून वारकरी परंपरेवर वाद ओढावला नव्हता. एकदाची ती कसर स्वामी गोविंददेवगिरी महाराजांनी पुण्यात बरोबर भरून काढली. त्यांच्या वक्तव्याने वारकर्‍यांमध्ये मोठा रोष आहे. काय म्हणाले गोविंददेवगिरी महाराज?

दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे तर... स्वामी गोविंददेवगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
गोविंददेवगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 04, 2026 | 2:13 PM
Share

Dnyaneshwari Eknathi Bhagwat Tukaram Gatha and Dasbodh: समता, बंधुतेची पताका खांदी घेऊन वारकरी समाजाने महाराष्ट्र धर्माची वीण घट्ट विणली. समरसतेच्या पुढचा विचार या परंपरेने जपला. पण गेल्या काही दशकात वारकऱ्यांवरच आणि वारकरी परंपरेवरच अनेक आघात होत असल्याचे दिसते. वारकरी परंपरेतील कच्चे दुवे शोधून त्यातून वाद घडवून आणले जात असल्याची ओरड होत आहे. त्यातच आता गोविंददेवगिरी महाराजांनी पुण्यात एक विधान केलं आणि वारकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. वारकरी परंपरेवरील त्यांचे हे भाष्य वादग्रस्त ठरले आहे. काय म्हणाले स्वामी गोविंददेवगिरी महाराज?

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचं वादग्रस्त वक्तव्य

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी बीजभाषण केले. या बीजभाषणादरम्यान स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी संतपरंपरेविषयी एक मांडणी केली. त्यांच्या मते, संतपरंपरेत दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये तर नामदेव महाराज व तुकाराम महाराज यांच्या गाथा या संकलन असल्यामुळे त्या स्वतंत्र ग्रंथ मानता येत नाहीत, असे भाष्य केले. त्यांना निरुपण करताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत होता हे समोर आले नसले तरी त्यांच्या या वक्तव्याने वाद मात्र झडला आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

संत परंपरेत संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, संत तुकाराम यांचा मोठा अधिकार मानल्या जातो. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासी कळस’ अशी संत परंपरा शिकवते. अशावेळी थेट संतपरंपरेच्या गाभ्यावरच अशी टीका केल्याने वारकरी संतापले आहेत. वारकरी संघटनांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तर संत परंपरेच्या फडातही या चिंतनावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. रामदासी आणि वारकरी पंथात उभा भेद असला, भक्ती मार्ग वेगळा असला तरी ईश्वर प्राप्ती हेच अंतिम उद्दिष्ट मानले जाते. पण गोविंददेव गिरी यांच्या या वक्तव्याने राज्यभरातील वारकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

ते RSS चे प्रोडक्ट

गोविंद गिरी महाराज हे आरएसएस प्रॉडक्ट आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची ‘गाथा’ बहुजनांसाठी होती, हे भटळलेल्या स्वामी गोविंद गिरी महाराजांना समजणार नाही अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी स्वामी गोविंदगिरी महाराजांवर केली आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Follow Us
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध