AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन 50 मेगापिक्सेल कॅमेरे असलेला वनप्लसचा ‘हा’ स्मार्टफोन 10 हजार 500 रुपयांनी झाला स्वस्त

OnePlus 13 स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 10 हजार 500 रूपयांनी स्वस्त झाला असून मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनच्या सवलतीबद्दल जाणून घेऊयात.

तीन 50 मेगापिक्सेल कॅमेरे असलेला वनप्लसचा 'हा' स्मार्टफोन 10 हजार 500 रुपयांनी झाला स्वस्त
one plusImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 04, 2026 | 2:31 PM
Share

तुम्ही जर फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल पण तुमचं बजेट कमी असेल तर आपण अशी एक डील आहे जी तुम्हाला आवडेल. फ्लिपकार्टवर OnePlus 13 या स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे, तर हा फोन 13 हजार 400 रूपयांची सवलत देण्यात आली आहे. या प्रकारच्या डील सहसा मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. या फोनची सवलतीची किंमत आणि वैशिष्ट्ये आपण आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

OnePlus 13 ची भारतात किंमत

हा फ्लॅगशिप फोन 69 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, परंतु सध्या तो फ्लिपकार्टवर 59 हजार 499 रूपयांमध्ये विकला जात आहे. याचा अर्थ हा हँडसेट 10 हजार 500 रूपयांनी स्वस्त झाला असून या कमी किमतीत खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस/एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या पेमेंटवर 2,975 रूपयांची अतिरिक्त सूट देखील मिळते.

तुम्हाला जर अतिरिक्त सवलत हवी असेल, तर तुमचा जुना फोन एक्सचेंज करून अतिरिक्त सवलत मिळवू शकता. स्पर्धेच्या बाबत बोलायचे झाले तर हा फोन या किंमत श्रेणीतील iQOO, Apple, Vivo, Motorola आणि Samsung सारख्या प्रमुख ब्रँडच्या स्मार्टफोन्सना जोरदार स्पर्धा देतो.

OnePlus 13 5G स्पेसिफिकेशन्स

या फ्लॅगशिप फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी अ‍ॅड्रेनो 830 जीपीयू आहे. हा फोन 24 जीबी पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1 टीबी पर्यंत यूएफएस 4.0 स्टोरेजसह उपलब्ध आहे. फोनमध्ये 6000 एमएएच बॅटरी आहे जी 100 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50 वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 6.82 इंचाचा क्यूएचडी+ एलटीपीओ ३के डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, एचडीआर10+ सपोर्ट आणि 4,500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देतो.

कॅमेरा सेटअपच्या बाबतीत बोलायचे झाले तर या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 3x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि 120x पर्यंत डिजिटल झूम सपोर्ट आहे. शिवाय, तुम्हाला 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील मिळेल.

Follow Us
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.