IPL 2026: विराटकडून सलग 5 चौकार, त्यानंतर रबाडाचा पलटवार, काय केलं?
Virat Kohli vs Kagiso Rabada: विराट कोहली याने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कगिसो रबाडाची धुलाई करत एकाच ओव्हरमध्ये सलग 5 चौकार लगावले. विराट सलग 6 चौकार लगावण्यात अपयशी ठरला. मात्र त्यानंतर ससलग 5 चौकारांसह खास कामगिरी करुन दाखवली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आयपीएल स्पर्धेच्या 42 व्या सामन्यात गुरुवारी 30 एप्रिलला धमाका केला. विराटने गुजरातच्या गोलंदाजाची धुलाई करत एकाच ओव्हरमध्ये सलग 5 चौकार लगावले. विराटने कगिसो रबाडा याच्या बॉलिंगवर एकाच ओव्हरमध्ये सलग 5 चौकार लगावण्याची कामगिरी केली. रबाडा विराटला वेगात चेंडू टाकत होता. मात्र विराटने रबाडाच्या त्याच वेगाचा फायदा घेत दणादण चौकार लगावले. रबाडाने टाकलेल्या बाउन्सर विराटने चौकार लगावला. विराट त्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या बॉलवर अप्रतिम ड्राईव्ह खेळला. मात्र रबाडाने एकाच बॉलमध्ये पलटवार केला. रबाडाने एकाच बॉलमध्ये विराटचा हिशोब केला.
रबाडाने आरसीबीच्या डावातील दुसरी आणि आपल्या कोट्यातील पहिली ओव्हर टाकली. विराटने रबाडाच्या ओव्हरमधील पहिल्या 5 बॉलमध्ये सलग 5 चौकार लगावले. विराटला सलग सहावा चौकार लगावण्याची संधी होती. मात्र रबाडाने हुशारीने सहावा आणि शेवटचा बॉल टाकला. त्यामुळे विराटची सलग 6 चौकाराची संधी हुकली. रबाडाने अशाप्रकारे त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये एकूण 21 धावा दिल्या. त्यानंतर रबाडाने विराटला आऊट करत सलग 5 चौकारांची परतफेड केली.
रबाडाकडून विराटची शिकार
रबाडा आरसीबीच्या डावातील चौथी ओव्हर टाकायला आला. रबाडाने पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा दिल्यानंतरही गुजरातचा कॅप्टन शुबमन गिल याने रबाडाला डावातील चौथी ओव्हर टाकण्याची संधी दिली. विशेष म्हणजे रबाडाने शुबमनचा विश्वास खरा ठरवला. रबाडाने ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर विराटला आऊट केलं. रबाडाने विराटला बाऊन्सवर राशीद खान याच्या हाती कॅच आऊट केलं. अशाप्रकारे विराटच्या खेळीचा शेवट झाला. विराटने 13 बॉलमध्ये 28 धावा केल्या. विराटने या खेळीत एकूण 5 चौकार आणि 1 षटकार लगावला.
रबाडाचा विराटला ‘पंच’
रबाडाने विराटला टी 20 क्रिकेटमध्ये आऊट करण्याची ही पाचवी वेळ ठरली. विराटने रबाडाचा आतापर्यंत एकूण 79 चेंडूंचा सामना केला आहे. विराटने या दरम्यान 22.2 च्या सरासरीने 111 धावा केल्या आहेत. विराटची रबाडा विरुद्धची आकडेवारी गुजरातला माहित होती. त्यामुळेच 5 चौकार खाऊनही कॅप्टन शुबमनने रबाडाला 1 ओव्हरच्या अंतराने पुन्हा संधी दिली.
विराट तिसराच फलंदाज
दरम्यान विराट गुजरात विरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मात्र विराटने 10 वर्षानंतर आरसीबीसाठी खास कामगिरी केली. विराट एका ओव्हरमध्ये 5 आणि त्यापेक्षा जास्त चौकार लगावणारा आरसीबीचा दुसरा फलंदाज ठरला. याआधी 2016 साली स्वत: विराटने रायजिंग पुणे सुपर जायंट्स विरुद्ध सलग 5 चौकार लगावले होते. तसेच ख्रिस गेल याने 2013 साली पुणे वॉरियर्स विरुद्ध एका ओव्हरमध्ये चौकारांचा पंच लगावला होता.
