हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात… पहा VIDEO
नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांच्या सहलीदरम्यान एक वेगळीच घटना घडली. मतदारांना मार्गदर्शन सहलीसाठी घेऊन जाण्यात येत असताना भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी अतिउत्साहात बसचे स्टेअरिंग स्वतःच्या हाती घेतले.
नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांच्या सहलीदरम्यान एक वेगळीच घटना घडली. मतदारांना मार्गदर्शन सहलीसाठी घेऊन जाण्यात येत असताना भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी अतिउत्साहात बसचे स्टेअरिंग स्वतःच्या हाती घेतले. यावेळी त्यांनी चालकाला खाली उतरवून स्वतः बस चालवण्याचा प्रयत्न केला.
मात्र बस सुरू होताच नियंत्रण सुटल्याने बसने थेट हॉटेलच्या भिंतीला धडक दिली. या अपघातात बसचे किरकोळ नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बसमधील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्येही या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीपूर्वी मतदारांना मार्गदर्शनासाठी ही सहल आयोजित करण्यात आली होती. मात्र सहलीपेक्षा शहराध्यक्षांच्या ड्रायव्हिंगचीच चर्चा आता नाशिकमध्ये अधिक रंगताना दिसत आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Published on: Jun 15, 2026 07:35 PM
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच

