AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!

Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!

| Updated on: Jun 15, 2026 | 4:54 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर उर्वरित 5 खासदार ऑनलाइन सहभागी झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता.

मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, त्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या खासदारांनी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, या घडामोडींमुळे ठाकरे गटात हालचाली वाढल्या असून, संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. या संभाव्य पक्षांतरामुळे शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, “पाच खासदार आले म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत आणि तेच राहतील.” तसेच ‘ऑपरेशन टायगर’बाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगत त्यांनी सावध भूमिका घेतली.

Published on: Jun 15, 2026 04:54 PM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार