AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...

खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा…

| Updated on: Jun 15, 2026 | 6:08 PM
Share

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान, दिल्लीमध्येही यासंदर्भात मोठ्या हालचाली वाढल्याची माहिती समोर आली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान, दिल्लीमध्येही यासंदर्भात मोठ्या हालचाली वाढल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

या सर्व घडामोडींमध्ये आता उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्यांना जायचं आहे, त्यांनी खुशाल जावं, त्यांच भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही. पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जो सोडून जाईल, त्यांना एक दिवस नक्की पश्चात्ताप होईल.”

तसेच त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत सहन करायला शिकावे, असेही म्हटले आहे. त्यामुळे पक्षातील संभाव्य फुटीबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Jun 15, 2026 06:03 PM

Follow Us